कठुआ अतिरेकी हल्ल्यातील शहीद जवानांचे पार्थिव देहराडूनला पोहोचले

जम्मूच्या कठूआत अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात (attack) पाच जवान शहीद झाले होते. त्यांच्या पार्थिवांचे मंगळवारी सायंकाळी देहराडून एअरपोर्टवर आगमन झाले. येथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या अतिरेकी हल्ल्यात रुद्रप्रयागचे नायब सुभेदार आनंद सिंह, लॅंसडॉन येथील हवालदार कमल सिंह, टीहरी गढवालचे नायक विनोद सिंह, रिखणीखालचे रायफल मॅन अनुज नेगी आणि टीहरीच्या थाती दांगलचे रायफल मॅन आदर्श नेगी असे पाच जवान शहीद झाले होते. विरोधी पक्षांनी या हल्ल्यानंतर सरकारला अतिरेक्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे.

देहराडून विमानतळावर शहीदांच्या पार्थिवांचे आगमन झाल्यावर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शहीदांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्री धामी यांनी जवानांच्या बलिदानामुळे देशाचे मोठे नुकसान झाल्याचे नमूद केले. त्यांनी भारतीय सैन्यावर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध केला व जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे आश्वासन दिले. मुख्यमंत्री धामी यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे.

या हल्ल्याने संपूर्ण उत्तराखंड राज्यात शोककळा पसरली आहे. कठुआत झालेल्या या अतिरेकी हल्ल्यात उत्तराखंडातील पाच जवान शहीद झाल्याचे वृत्त आल्यानंतर संपूर्ण राज्यात दु:खाची लाट पसरली आहे.

दोन महिन्यांपूर्वीच मोठी घुसखोरी

कठुआ येथील लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर (attack) पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणात दहशतवादी घुसल्याचे समोर आले आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी ही घुसखोरी झाली होती. कठुआच्या माचेडी भागात दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर ग्रेनेड फेकल्याने पाच जवान शहीद झाले, तर अन्य पाच जवान जखमी झाले आहेत. त्यानंतर सैन्याने मोठे कोबिंग ऑपरेशन राबवून दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांचा संपूर्ण गँग सामील होती. हा दहशतवादी हल्ला नॉर्दर्न आणि वेस्टर्न कमांडमधील इंटरफॉर्मेशन सीमेजवळ झाला.

हेही वाचा :

540 कोटींच्या घोटाळ्यात IAS राणू साहू अडकल्या..

एलपीजी गॅस धारकांसाठी केंद्रीय मंत्री पुरी यांची मोठी घोषणा

मोठी राजकीय घडामोड, महाराष्ट्रात तिसरी आघाडी उभी राहणार, चार राजकीय पक्ष एकत्र येणार