शरद पवारांनी एनडीएत येण्याच्या मोदींच्या विधानावर देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले

शरद पवार यांनी काँग्रेसबरोबर जाण्यापेक्षा एनडीएत यावं असं विधान(pro forma) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदूरबारच्या सभेत बोलताना केले होते.

शरद पवार यांनी काँग्रेसबरोबर जाण्यापेक्षा एनडीएत यावं असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदूरबारच्या सभेत बोलताना केले होते. त्यांच्या या विधानानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, यासंदर्भात आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी असा कोणताही प्रस्ताव दिला नसून त्यांचे विधान म्हणजे शरद पवारांच्या पक्ष विलनीकरणाच्या विधानावर दिलेली प्रतिक्रिया होती, असे ते म्हणाले. एएनआय वृत्तसंस्थेही बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“निवडणुकीनंतर छोट्या प्रादेशिक पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल, असे शरद पवार स्वत: म्हणाले होते. कारण या निवडणुकीत काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांचा पराभव होणार, हे त्यांच्या लक्षात आलं होतं. म्हणून त्यांही हे विधान केलं होतं. त्यांच्या या विधानावर पंतप्रधान मोदी यांनी आज प्रतिक्रिया दिली. त्यामुळे पंतप्रधान मोदींचे विधान म्हणजे काही दोन्ही पक्षांना एनडीएत येण्याचं निमंत्रण होतं, असं नाही. माध्यमांशी त्याचा चुकीचा अर्थ लावला”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुढे बोलताना, माध्यमांनीही कोणत्याही विधानाचा अर्थ लावताना पूर्ण विधानाच्या आधारे त्याचा अर्थ लावला पाहिजे, असेही ते म्हणाले