बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर चारही बाजून विरोध टीका करताना दिसत आहे. एकीकडे भाजप (BJP) आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर (allegation)आरोप केले आहे तर आता मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे (allegation)जातीयवाद करत आहेत,ते टोळ्या पाळतायत असा आरोप धनंजय मुंडे यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. ते आज जालना येथे माध्यमांशी बोलत होते.
माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आमची लढाई आरक्षणाचीच आहे पण तुम्ही लोक मारून टाकायला लागल्यानंतर बोलायचं नाही का? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला तसेच धनंजय मुंडे जातीयवाद करत आहेत.
ते टोळ्या पाळत आहे. असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मी लढत आहे आणि न्याय मिळेपर्यंत लढणार आहे. असेही यावेळी जरांगे पाटील म्हणाले.
तर मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत धनंजय मुंडे आता ओबीसींनी फोन करून त्यांच्या बाजूने उभे राहायला सांगतायत आहे. तसेच लोकांच्या पोरांच्या हत्या करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी टोळ्या पाळल्या आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारने तत्परता का दाखवली नाही? असा सवाल देखील यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.
याच बरोबर धनंजय मुंडेंचे गुंड संतोष देशमुखांच्या भावाला धमक्या देत आहे. म्हणून त्यांना बोललो कुठल्या जातीला बोललो नाही तसेच या प्रकरणात मराठा आणि ओबीसी संबंध येतो कुठे? असा सवाल देखील माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.
हेही वाचा :
Technology, Safety आणि Performance मध्ये Hyundai Creta EV सर्व कार्सना टाकणार मागे, मिळणार ‘हे’ फीचर्स
10 वी-12 वी शिक्षण झालेल्या तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी
लाईव्ह पॉडकास्टमध्येच रॅपरनं स्वतःवर झाडली गोळी; चाहत्यांना बसला धक्का! Video Viral