धनुष-ऐश्वर्या करत होते एकमेकांची फसवणूक, दोघांचेही सुरु होते Extramarital Affair

लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता धनुष आणि रजनीकांत यांची ऐश्वर्यानं 2004 मध्ये लग्न(extra marital dating) केलं. तर 2022 मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा 18 वर्षांचा सुखी संसार तिथेच संपला. त्यांच्या या निर्णयानं त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला आणि चाहत्यांना धक्का बसला. ऐश्वर्या आणि धनुषच्या घटस्फोटाचं कारण काय होतं ते देखील समोर आलं नाही. आता गायिका सुचित्रानं धक्कादायक खुलासा केला आहे. सुचित्रानं दावा केला की धनुष आणि ऐश्वर्यानं लग्नानंतर एकमेकांची फसवणूक केली. ते दोघं एकमेकांनी चीट करत होते आणि त्यांचं एक्स्टा-मॅरिटल अफेयर म्हणजेच विवाहबाह्य संबंध होते.

सुचित्रानं सांगितलं की लग्न झाल्यानंतर ऐश्वर्या आणि धनुष दुसऱ्या लोकांसोबत डेटवर(extra marital dating) जायचे. सुचित्रानं ऐश्वर्याला एक वाईट आई म्हटलं आहे तर धनुष हा वडिलांची कर्तव्य पूर्ण करतोय म्हटलं आहे. सुचित्रानं यूट्यूब चॅनल ‘कुमुदम’ ला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या आणि धनुषविषयी सांगितलं की ‘ऐश्वर्या ही धनुषवर फसवणुक केल्याचे आरोप करत आहे. पण तिनं देखील संपूर्ण वैवाहिक आयुष्यात तेच केलं आहे. हे डबल स्टॅन्डर्ड्स नाही का? ऐश्वर्यानं धनुषची फसवणुक केली, धनुषनं ऐश्वर्याची फसवणुक केली. ते असं जोडपं आहे जे सिस्टमॅटिक पद्धतीनं एकमेकांची फसवणुक करत होते.’

सुचित्राला जेव्हा विचारण्यात आलं की ती कोणत्या आधारावर धनुष आणि ऐश्वर्यावर असे आरोप करत आहेत. तर तिनं सांगितलं की त्या दोघांचे छोटे-मोठे फ्लिंग राहिले आहेत. त्यांनी बारमध्ये बसून त्या व्यक्तीसोबत ड्रिंक केलं आहे, ज्यांना ते डेट करत होते. लग्नानंतर डेटवर जाणं नॉर्मल आहे? तिला आशा आहे की ऐश्वर्यानं वडील आणि अभिनेता असलेले रजनीकांत यांच्यासोबत रहावं. सुचित्रानं केलेल्या या दाव्यानं सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. आता या सगळ्या प्रकरणावर ऐश्वर्या आणि धनुषची काय प्रतिक्रिया आहे हे त्यांच्या सगळ्या चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात त्या दोघांनी एकमेकांची संमतीनं घटस्फोटाची अर्ज केला आहे. त्यामुळे त्या दोघांमध्ये कोर्टात काही वाद होणार नाही आणि त्याशिवाय शांतपणे सगळ्या गोष्टी होतील. मात्र, पुन्हा एकदा आता त्यांच्या घटस्फोटाची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा :

कोल्हापुरात, तारेवरची नव्हे चक्क रस्त्यावरची कसरत!

कोल्हापुरमध्ये खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या 

क्रिकेट फॅन्ससाठी गुड न्यूज! CSK आणि RCB दोघंही जाऊ शकतात प्लेऑफमध्ये