कोल्हापूर जिल्हा प्रशासन ऍक्शन मोडवर, अनधिकृत होर्डिंगवर कारवाईला सुरवात

मुंबईच्या घाटकोपर येथे होर्डिंग(hoarding company) कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर कोल्हापूर जिल्हाप्रशासनाला जाग आली आहे. जिल्हाधिकारी यांच्यासह आयुक्त सक्रिय झाले आहेत. कोल्हापूर शहरात अनधिकृतपणे लावलेले होर्डिंग काढण्याचे काम कोल्हापूर महानगरपालिकेने सुरू केले आहे.

मुंबईतील दुर्घटना घडल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेने विनापरवाना उभा केलेल्या होर्डिंग(hoarding company) मालकांना नोटीस पाठवत शहरातील 20 ते 25 अनाधिकृत होर्डिंग काढण्यात आले. काही होर्डिंग स्वतः मालकांनी काढून घेतले. तर काही होर्डिंग कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी काढण्यास सुरवात केली आहे. जिल्हाधिकारी अमोल गेडगे यांनी देखील बेकायदेशीर होर्डिंगवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत.

महापालिकेकडे असलेल्या परवानगीपेक्षाही अनेक मोठी होर्डिंज अनधिकृत असल्याचे तपासणीत आढळून येत आहे. तसेच, परवानगीच्या आडून कुणी अधिकचे होर्डिंग उभी केली आहेत का? याचीही तपासणी केली जात आहे. आतापर्यंत याकडे लक्ष दिले नसल्याचेच स्पष्ट होत आहे. शहरातील अनेक इमारतींवर होर्डिंग्ज आहेत. ती लोखंडी स्ट्रक्चरवर उभी राहिली आहेत. तसेच, अनेक उंच इमारतींवरही स्ट्रक्चरच्या आधारे उभी केली आहेत.

मुंबईतील दुर्घटनेत परवानगी असलेले होर्डिंग्ज पडल्याने कधी, कशाची वेळ येईल हे सांगता येत नसल्याची नागरिकांत चर्चा आहे. बहुतांश होर्डिंग्ज रस्त्याशेजारी आहेत. त्यामुळे महापालिकेने अनधिकृत होर्डिंग्ज तपासणीची मोहिम सुरू केली आहे. त्यात परवानगी आणि प्रत्यक्ष जागेवरील स्थिती तपासली जात आहे. त्यामुळे घराच्या बांधकामाप्रमाणे वाढीव काम झाले आहे का? याचाही शोध घेतला जात आहे.

कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर जिल्ह्यातील इचलकरंजी आणि कोल्हापूर महानगरपालिकेतील प्रशासन अलर्ट झाले आहे. गुरूवारी नोटीस लागू केलेल्या हॉकी स्टेडियम येथील अनधिकृत 40 बाय 20 फुटांचे होर्डिंग मालकांनी स्वतःहून उतरवून घेतले. आरोग्य निरीक्षकांमार्फत शहरामध्ये सर्व्हे करण्यात येणार असून विनापरवाना आणि परवानाधारक होर्डिंग यांची तपासणी करण्यात येणार असल्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी दिले आहेत.

हेही वाचा :

गौतम गंभीरला टीम इंडियाचा कोच होण्याचा आग्रह

मिरजेत एकावर कोयत्याने वार; संशयित अल्पवयीन

माझी वाट लागलीये प्लीज…, हात जोडून रोहित शर्माने कोणाला केली विनंती?