चेहऱ्यावर तुम्हीसुद्धा बॉडी लोशन लावता का? मग जाणून घ्या त्वचेवर होणारे गंभीर दुष्परिणाम

उन्हाळ्यासह सर्वच ऋतूंमध्ये महिला त्वचेची काळजी घेतात. मात्र थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा अधिक कोरडी आणि निस्तेज होऊन जातात. त्वचा कोरडी झाल्यानंतर त्यावर बाजारात उपलब्ध असलेले वेगवेगळे बॉडी लोशन(body lotion),मॉइश्चरायझ, क्रीम्स इत्यादी अनेक गोष्टी लावल्या जातात. मात्र तरीसुद्धा त्वचा कोरडी दिसू लागते. चेहऱ्याची त्वचा कोरडी झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात.

बॉडी लोशन(body lotion) लावल्यामुळे त्वचा हायड्रेट आणि मॉइश्चरायझ दिसू लागते. यामुळे त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहतो. बॉडी लोशनचा वापर हातापायांवरील त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केला जातो. मात्र अनेक महिला बॉडी लोशन चेहऱ्यावर लावतात. चेहऱ्यावर बॉडी लोशन लावणे अतिशय हानिकारक ठरू शकते.

चेहऱ्यावर त्वचा अतिशय मऊ आणि मुलायम असते. त्यामुळे त्वचेवर कोणत्याही गोष्टी लावू नये. त्वचेला सूट होईल अशाच प्रॉडक्टचा वापर त्वचेसाठी करावा, अन्यथा चेहऱ्यावर पिंपल्स, मुरूम, फोड इत्यादी गोष्टी येण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील त्वचेवर बॉडी लोशन लावल्यामुळे त्वचेवर कोणते दुष्परिणाम दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

बॉडी लोशन त्वचेवर लावल्यामुळे चेहऱ्याचे होणारे नुकसान:
चेहऱ्यावरील पोर्स बंद होतात:
चेहऱ्यावर बोडी लोशन(body lotion) लावल्यामुळे त्वचेवरील पोर्स बंद होतात, ज्यामुळे त्वचेमध्ये पिंपल्स आणि तेल तसेच साचून राहते. पिंपल्स आणि ब्लॅकहेड्स आल्यामुळे त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. बॉडी लोशनचे टेक्श्चर त्वचेसाठी अतिशय वेगळे आहे, त्यामुळे त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागतात.

चेहऱ्याची त्वचा कोरडी पडते:
बॉडी लोशन त्वचेला लावल्यामुळे त्वचा कोरडी पडून जाते. त्यामुळे त्वचेवर मेकअप केल्यानंतर सुद्धा त्वचा अधिक कोरडी दिसते. त्यामुळे चेहऱ्यावर बॉडी लोशन न लावता मॉइश्चरायझर लावावे.

अ‍ॅलर्जीची समस्या:
चेहऱ्यावरील त्वचा अतिशय संवेदनशील असते, त्यामुळे या त्वचेवर बॉडी लोशन लावण्याऐवजी त्वचेला सूट होईल असे मॉइश्चरायझर वापरावे, अन्यथा त्वचेवर लाल चट्टे, लालसरणपणा येण्याची शक्यता असते. केमिकलयुक्त प्रॉडक्ट त्वचेवर लावल्यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते.

हेही वाचा :

1 मार्च ‘या’ 5 राशींसाठी ठरणार वरदान! नोकरीत पगारवाढ, धनवैभव, आणि संपत्तीचे वरदान मिळेल

आता एकाच वेळी दोन पदव्या मिळवा; विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी

दोन भावांच्या भांडणात धाकटा भाऊ पडला विहिरीत; छातीला मार लागला अन्…