‘शक्तीपीठ’ विरोधात एल्गार; 25 जूनला एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करणार(Kolhapur) नसल्याचे स्पष्ट संकेत देताना फेर सर्वेक्षणाच्या संदर्भात ट्विट केल्यानंतर कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा आक्रोश निर्माण झाला आहे. शक्तिपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत रद्द करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा एकवटला आहे. फक्त कोल्हापूर जिल्हाच नव्हे, तर या महामार्गात येणाऱ्या 11 जिल्ह्यांमधून प्रचंड विरोध सुरू आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यामधून मोठा विरोध शक्तिपीठ महामार्गाला होत आहे.

सांगली जिल्ह्यातून(Kolhapur) सुद्धा शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेर सर्वेक्षणाची भूमिका ट्विटरवरून मांडल्यानंतर कोल्हापूरमध्ये शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे 25 जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.

या दौऱ्यामध्ये हजारो शेतकरी मोर्चाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाब विचारणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे हजारो शेतकरी मोर्चाने मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार असल्याची माहिती शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे समन्वय गिरीश फोंडे यांनी दिली आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 59 गावे शक्तीपीठ महामार्गाच्या कामामध्ये बाधित होणार आहेत. यामध्ये सर्वाधिक भूदरगड तालुक्यातील 21 गावांचा समावेश आहे. त्या खालोखाल कागल तालुक्यातील 13 गावांचा समावेश आहे. करवीर तालुक्यातील 10 गावांचा समावेश आहे.

या महामार्गात होणारी बाधित होणारी गावे कोणती आहेत?
शिरोळ तालुका
– कोथळी, दानोळी, निमशिरगाव, तारदाळ
हातकणंगले तालुका – तिळवणी, साजणी, माणगाव, पट्टणकोडोली,
करवीर तालुका – सांगवडे, सांगवडेवाडी, हलसवडे, नेर्ली, विकासवाडी, कणेरीवाडी, कणेरी, कोगील बुद्रुक, वडगाव खेबवडे
कागल तालुका – कागल, व्हनूर, सिद्धनेर्ली, एकोंडी, बामणी, व्हनाळी, कोनवडे, सावर्डे बुद्रुक, सावर्डे खुर्द, सोनाळी कुरणी, निढोरी, व्हनगुत्ती
भुदरगड तालुका – आदमापूर, वाघापूर, मडिलगे बुद्रुक, कूर, मडिलगे खूर्द निळपण, धारवाड, म्हसवे, गारगोटी, आकुर्डी, पुष्पनगर, सोनारवाडी, मडूर, करडवाडी, शेळोली, वेंगरूळ, सोनुर्ली, मेघोली, नवले, देवर्डे, कारिवडे
आजरा तालुका – दाभिल, शेळप, पारपोली, आंबाडे, सुळेरान

हेही वाचा :

मलायका अरोरासोबत करणार अर्जुन कपूर लग्न?, अनिल कपूर म्हणाले…

छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

महाराष्ट्रात आरक्षणावरुन ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष पेटला, ओवैसींनी केली मोठी मागणी!