100 वर्षांचे सुपरफास्ट आजोबा! अवघ्या 26.34 सेकंदात पार केलं 100 मी. अंतर; वर्ल्ड रेकॉर्डही मोडला

वयाची साठी पार होताच आरोग्याच्या अनेक तक्रारी उद्भवतात. सांधेदुखी, गुडघेदुखी जाणवते. नीट चालता येत नाही अशावेळी चालण्यासाठी काठीचा आधार घ्यावा लागतो. अशात वयाची शंभऱी गाठणं तसं अशक्यच आणि गाठली तरी साठीनंतर शरीराची अशी अवस्था झाली तर शंभरीत काय असेल? याची कल्पना आपण करूच शकतो. पण वयाची शंभरी पार केलेल्या आजोबांनी जे करून दाखवलं ते पाहून तरुणांनाही लाज वाटेल. 100 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीने अवघ्या 26.34 सेकंदात(seconds) 100 मीटर अंतर पार केलं आहे. लेस्टर राइट असं या वृद्ध व्यक्तीचं नाव आहे.
या स्पर्धेत ते इतके सुसाट धावले इतके सुसाट धावले की त्यांनी 2015 सालचा डोनाल्ड पेलमॅनचा 26.99 सेकंदात(seconds) रेस पूर्ण करण्याचा वर्ल्ड रेकॉर्डही मोडला आहे. हे – रब ने बना दी जोडी! 36 इंचाच्या नवरदेवाला भेटली 34 इंचाची नवरी; कपलची एक झलक पाहण्यासाठी गर्दी ट्विटरवर राइट यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. त्यांच्या हिमतीला, जिद्दीला आणि चिकाटीला सर्वांनी दाद दिली आहे.
फॉक्स 29 शी बोलताना लेस्टर म्हणाले, जर तुम्ही कोणत्या रेसमध्ये धावत आहात तर पहिलं येण्याचाच विचार करा. लोक दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकासाठी रेसमध्ये कसे धावतात मला माहिती नाही. हे बाबो! लग्नात 24 कॅरेट Gold Dress घालून आली नवरीबाई; पाहताच पाहुण्यांनी…
द गार्डियनच्या रिपोर्टनुसार लेस्टर यांचं अॅथलिट करिअर 80 वर्षांपेक्षा जास्त आहे. 1930 च्या दशकात त्यांनी धावायला सुरुवात केली. दुसऱ्या महायुद्धादरम्यान त्यांनी इथं ब्रेक घेतला. बॅटल ऑफ बल्जमध्ये त्यांनी सेवा दिली. त्यावेळी कित्येक बॉम्बस्फोटात ते वाचले. त्यांना चार ब्राँझ मेडलही मिळाले आहेत.
“भोंगेबाज राजकारण्यांनी हिंदुत्वाचासुध्दा गळा घोटला”
दोन वर्षांपूर्वी झालेल्या हत्येचे गुढ उलगडले
नवनीत राणा जे. जे. रुग्णालयात दाखल
‘चेन्नईला कसं कम बॅक करायचं हे चांगलंच कळतं’