१७ वर्षे ‘लिव्ह इन’,…अखेर ५४ वर्षी ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाने केले लग्न

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक (director) हंसल मेहता वयाच्या ५४ व्या वर्षी विवाहबद्ध झाले आहेत. तब्बल १७ वर्षे सफीना मेहता यांच्याशी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. आज ते विवाहबद्ध झाले. सफीना या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत. एज्युकेट गर्ल्स या संस्थेच्या त्या संस्थापक आहेत.
हंसल मेहता (director)यांनी आपल्या लग्नाचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर करत ही माहीती चाहत्यांना दिली. त्या फोटोंना त्यांनी कॅप्शनही दिले आहे. यामध्ये लिहले आहे की, “17 वर्षानंतर आपल्या मुलांना मोठं होताना पाहत असताना तसेच स्वत:ची स्वप्न पूर्ण करत असताना आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. पुढे लिहले आहे की, जीवनातील इतर गोष्टींसारखेच हे पण अचानक आणि अनियोजित घडले आहे. प्रेम हे इतर गोष्टींवर विजय मिळवते.”
त्यांच्या या पोस्टवर मनोज बाजपेयी, हुमा कुरेशी, राजकुमार राव, विशाल भारद्वाज आदी कलाकारांसह चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. माेजक्या लाेकांच्या उपस्थित हा विवाह पार पडला. सध्या हंसल मेहता स्कॅम २००३ : द तेलगी स्टोरी या चित्रटाच्या कामात व्यस्त आहेत.
हेही वाचा :