एका ब्रेकअपनं अभिनेत्याची केली ही अवस्था; ‘ती’ गेली आणि…

breakup

आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात असताना त्या व्यक्तीचा सहवासही आपल्याला खूप काही देऊन जातो. अशा वेळी तिच व्यक्ती आयुष्यातून निघून गेल्यास होणारं (breakup) दु:ख मात्र सहन होण्यापलीकडलं असतं. एका अभिनेत्यानं याच दु:खाचा सामना केला आणि पाहता पाहता तो नैराश्याचा आहारी गेला. (Bollywood )

हा अभिनेता म्हणजे दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा, प्रतीक बब्बर. प्रतीकनं ‘Jaane Tu Ya Jaane Na’ या चित्रपटातून त्यानं सहायक अभिनेत्याची भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं.(breakup)

त्यानंतर ‘Ekk Deewana Tha’ या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. अभिनेत्री एमी जॅकसन हिच्यासोबत त्यानं स्क्रीन शेअर केली.

पुढे ही जोडी रिलेशनशिपमध्येही होती. पण, हे नातं फार काळ टिकू शकलं नाही ज्यामुळं प्रतीक पुरता तुटला.

एका मुलाखतीमध्ये प्रतीकनं त्याच्या या नात्यावर वक्तव्य केलं. एमीसोबतच्या नात्यात गोष्टी नेमक्या किती बदलल्या हे त्यानं सांगितलं.

‘Ekk Deewana Tha’ हा चित्रपट चांगला होता, पण मी तिच्या (एमीच्या) प्रेमात पडलो, सर्वकाही छान होतं पण, वाईट काळ तेव्हा सुरु झाला, ज्यावेळी माझा प्रेमभंग झाला’, असं तो म्हणाला.

वयाच्या पंचवीशीमध्ये प्रेमभंग वगैरे गोष्टींचा तुमच्यावर वेगळाच परिणाम असतो, असं सांगत आपण नैराश्यग्रस्त झाल्याची भावना त्यानं व्यक्त केली.

breakup

काही दिवसांपूर्वीच इंटिमेट दृश्यांबाबदत वक्तव्य करत प्रतीक प्रकाशझोतात आला होता. इंटिमेट दृश्य किंवा किसिंग सीनसाठी एखाद्या कलाकारानं त्याच्या जोडीदाराची परवानगी होण्याचा त्यानं विरोध केल्याचं पाहायला मिळालं.

प्रतीक कायमच त्याच्या भूमिकांसाठी ओळखला गेला. साचेबद्धतेला शह देत त्यानं साकारलेल्या भूमिका मोजक्या असल्या तरीही त्या प्रेक्षकांच्या तितक्याच आवडीच्या आहेत यात शंका नाही.

हेही वाचा :


मोबाईल वापरणाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *