मस्त खा, आनंदी रहा – स्नेहा रायकर

movies

मृदा झरेकर, डहाणूकर कॉलेज

चित्रपट आणि मालिकांमधील ओळखीचा चेहरा म्हणजे स्नेहा रायकर. स्नेहाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली आणि नंतर चित्रपटसृष्टीत प्रवेश केला(movies ).

‘श्री सिद्धिविनायक महिमा’, ‘इरादा पक्का’, ‘व्हॉट्सअॅप लग्न’ अशा मराठी चित्रपटांत तिने काम केले आहे. स्नेहा फुडी आहे. मस्त खा आणि आनंदी रहा, हा तिचा फंडा(movies ).

स्नेहा रायकर खूप छान स्वयंपाक करते. खरं तर तिला आधी स्वयंपाक करायला आवडायचे नाही. कॉलेजमध्ये असताना तिने नवनवीन पदार्थ बनवायला सुरुवात केली. हळूहळू तिला खूप चांगले जेवण बनवता येऊ लागलं. स्नेहाच्या मुलाला तिच्या हातचं चिकन लजानिया खूपच आवडतं आणि तिच्या पतीला स्नेहाने बनवलेला शिरा व साबुदाण्याची खिचडी अतिशय आवडते. तिच्या घरी बेसनाचे लाडू फक्त दिवाळीला नव्हे तर अधूनमधूनही बनवले जातात. लाडवाचा गोडवा म्हणूनच तिच्या व्यक्तिमत्वात आहे, असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.

लॉकडाऊनच्या काळात स्नेहाने स्वयंपाकघरात खूप प्रयोग केले. तिच्या पतीनेही वेगवेगळे पदार्थ बनवले. पतीच्या हातचं चीज ऑम्लेट स्नेहाला सर्वात जास्त आवडले. लॉकडाऊनमध्ये काही किचन प्रयोग यशस्वी झाले तर काही फसले, असे ती सांगते. त्यांनी चोको लावा केक दोन-तीनदा बनवण्याचा प्रयत्न केला, पण दरवेळी फिसकटला अशा गंमतीजमती स्नेहाने सांगितल्या.

स्नेहाला घरचे जेवण जितके आवडते, तितकेच हॉटेलिंग करायलाही खूप आवडते. मोगलाई, इंडियन, चायनीज, चिकन चिली, प्रॉन्स चिली, चिकन टिक्का असं कोणता विशिष्ट पदार्थ नाही, पण जिकडे जाऊ तिकडच्या खास पदार्थाचा नक्की आस्वाद घेणार. आता मध्यंतरी ती कोलकत्ताला गेली होती, तिकडचे गोड पदार्थ तिला खूपच आवडले. कोलकत्ताची मिष्टी डोई, गुळातल्या पाकात केलेला रसगुल्ला आणि खिरीची अप्रतिम चव तिला भावली. मांसाहारात तिला फिश फ्राय सर्वात जास्त आवडते. शाकाहारात पालक पनीर, व्हेज कोल्हापुरी, वरण भात, काळय़ा वाटण्याची उसळ प्रियच. स्नेहा खूप फुडी आहे. पाणीपुरी, वडापाव, चीज सॅण्डविचसारखे स्ट्रीट फूड असू दे किंवा फेरणी, बालुशाही, गुलाबजाम, पंदी पेढे, लाडू, आईस हलवा असे गोड पदार्थ तिला फारचा आवडतात. अशा फार कमी डिश असतील ज्या तिला आवडत नाहीत. मेथी-बेसनासह लाडवाचे सगळे प्रकार तिला प्रियच.

‘अद्रक वाली चाय’ हे तिचे सदासर्वकाळ आवडतं पेय. कधीही कुठेही असली तरी स्नेहाला आलं घालून चहा लागतोच. सध्याच्या काळात सगळं सहज उपलब्ध होतं. त्यामुळे व्यायाम कमी होतो. आपण काम खूप करतो, पण शरीराला चालना देत नाही. त्यामुळे सगळय़ांनी भरपूर व्यायाम करा, ताण घेऊन नका, आनंदी रहा, असं ती सांगते(movies ).

Smart News:-