तीन मुलांची आई आणि प्रसिद्ध गायिका दुसऱ्यांदा अडकणार लग्न बंधनात

इंडस्ट्रीमध्ये कायम चर्चा रंगत असते ती म्हणजे, सेलिब्रिटींच्या (celebrity) अफेअरबद्दल… झगमगत्या विश्वात कधी कोणाचं नाव कोणासोबत जुळेल काही सांगता येत नाही. आता बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूर पुन्हा लग्न बंधनात अडकणार आहे. सध्या कनिकाच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये कनिका आयुष्यातील खास क्षणांचा अनुभव घेताना दिसत आहे.
कनिका 20 मे रोजी पुन्हा नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. कनिका (celebrity) लंडनमधील एनआरआय बॉयफ्रेंड गौतम सोबत आज सप्तपदी घेणार आहे. मेहंदी सोहळ्या दरम्यान कनिका आणि गौतम रोमँटिक होताना दिसले.
कनिकाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये ‘G I Love you sooooo much!’, असं लिहिलं आहे. सध्या कनिकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
कनिका कपूरबद्दल सांगायचं झालं तर, तिचं हे दुसरे लग्न आहे. तिचे पहिले लग्न NRI उद्योगपती राज चंडौक यांच्याशी झाले होते. तो लंडनचा रहिवासी होता, पण राज आणि कनिकाने 2012 मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला. कनिका कपूरला पहिल्या लग्नापासून तीन मुले आहेत.
हेही वाचा :