‘सरसेनापती हंबीरराव’मधील श्रुती मराठेचा पहिला लूक आला समोर!

सरसेनापती हंबीरराव हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर १४ मे २०२२ रोजी रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाचा ट्रेलरला दाद तर दिलीच शिवाय या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराविषयी (about the artist) जाणून घेण्यास उत्सुक आहेत.

आता या चित्रपटातील अभिनेत्री (about the artist) श्रुती मराठे हिचा पहिला लूक समोर आला आहे. स्वत: श्रुतीने हा फोटो शेअर केला आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा लूक पाहायला मिळेल. तिने या फोटोसोबत कॅप्शन लिहिलं आहे- ‘स्वराज्याच्या दोन्ही युवराजांना प्रेमानं वाढवलेली स्वराज्य माऊली!’

महाराणी सोयराबाईच्या भूमिकेत श्रुती मराठे दिसणार आहे. कथानक, संवाद, दिग्दर्शन अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडेचं आहे. हा चित्रपट २७ मे रोजी राज्यात रिलीज होईल. उर्विता प्रोडक्शनची निर्मिती असलेला चित्रपट शेखर मोहिते पाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांची निर्मिती आहे.

 

श्रुती मराठेच्या भूमिकेसाठी तिच्या फॅन्सनी तिला शुभेच्छा आणि अभिनंदन केले आहे. काही फॅन्सनी कमेंट केलं आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे-Cant wait to see you as Soyrabai!! 🔥😍. आणखी काही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे-खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐 👍👍👍👍, अप्रतिम❤️, congratulations ❤️, महाराणी सोयरा राणीसाहेब 🙏🏻🚩, Abhinandhan tai ❤️, Marathe🔥❤️, ❤️❤️❤️🔥, जय भवानी जय शिवाजी.

या चित्रपटात राकेश बापट, स्नेहल तरडे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट २७ मे रोजी रिलीज होणार आहे.

हेही वाचा :


हैवान! पाणी भरत नाही म्हणून वडिलांनी केली चिमुकल्याची हत्या!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *