मराठमोळ्या अभिनेत्रीचा साडीत हटके अंदाज..!

अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओकने बहुचर्चित ‘चंद्रमुखी’  चित्रपट लवकरच चाहत्याच्या भेटीला घेवून येत आहेत. या चित्रपटात मराठीमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता आदीनाथ कोठारे हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर अमृता खानविलकर नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून तिचे हटके आणि साडीतील फोटो (photo of saree) शेअर करत असते. सध्या तिच्या ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.

नुकतेच अमृता खानविलकर  तिच्या इन्स्टाग्रामवर साडीतील ब्लॅक अॅन्ड व्हाईट रंगाचे काही फोटो शेअर केले आहे. या फोटोत ती एका सोफ्याच्या जवळ हटके स्टाईलमध्ये बसलेली ग्लॅमरस दिसत आहे. यावेळी तिच्या मोकळ्या केसांनी आणि मेकअपने तिच्या सौदर्यांत भर घातली आहे. या फोटोतील खास म्हणजे, तिच्या नजरेने चाहत्यांना घायाळ केलं आहे. यावेळी तिने साडीमध्ये वेगवेगळ्या हटके पोझ दिल्या आहेत.(photo of saree)

 

शेअर केलेल्या एका फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘कोण आहेस तू चंद्रा ?’ असे लिहिले आहे. तर दुसऱ्या एका फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘रावळाबाहेरच्या वाहनेला गाभार्याचं दर्शन लवकरच … #chandra #chandradaulat #tohchandraati,’ या फोटोला कॅप्शन देताना अमृताने चंद्रमुखीला टॅग केलं आहे. यावरून अमृताचा आगामी चंद्रमुखी हा चित्रपट रिलीज होण्यास सज्ज असल्याचे समजते. हे फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत.

 

 

अमृताचा ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट २९ एप्रिल २०२२ रोजी चाहत्याच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात राजकारणात मुरलेले नेते खा. दौलत देशमाने आणि एक लावणी कलाकार असणाऱ्या ‘चंद्रा’ ची प्रेमकहाणी दाखविण्यात आली आहे. नुकतेच या चित्रपटातील एका पोस्टरने ‘चंद्रा’ ची मुख्य भूमिका अमृता साकारणार असल्याचे समजले आहे.

हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. चित्रपटाची पटकथा, संवाद चिन्मय मांडलेकर यांची आहे. तर अजय – अतुल यांनी संगीत दिले आहे. याशिवाय अमृता सोशल मीडियावर देखील सक्रिय असून तिचे हटके फोटो शेअर करत असते.

हेही वाचा :


कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यामुळे राजकारणात खळबळ!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *