प्रसिद्ध अभिनेत्याची मुलगी देतेय गंभीर आजाराशी झुंज !

प्रेमात आकंठ बुडलेल्या कपल्सचे जेव्हा ब्रेकअप होते तेव्हा त्यानंतर त्यांना अनेकदा डिप्रेशनचे (depression) शिकार व्हावे लागते. बॉलिवूडमध्ये ब्रेकअपचे प्रमाण खूपच वाढले आहे. ब्रेकअपमुळे अनेक कलाकार नैराश्याने ग्रासतात आणि त्यातून बाहेर पडायला त्यांना खूप वेळ लागतो. याच विळख्यात सध्या अभिनेता अमिर खानची मुलगी आयरा खानही सापडली आहे.
नुकतीच तिने एक इन्स्टा पोस्ट शेअर करत या गंभीर आजाराची माहिती दिली आहे. प्रचंड नैराश्यामुळे तिला एंग्जाइटी अॅटॅक येत आहे. पुढे काहीतरी भयानक होईल की काय या भीतीने तिला त्रास होत आहे. ऐन २३ व्या वर्षी डिप्रेशनचे (depression) परिणाम भोगत असलेल्या लेकीची अवस्था पाहून अमिर खानही चिंतेत आहे.
आयरा खान अमिर खान आणि रिना खान यांची मुलगी आहे. स्टार कीड असूनही ती बॉलिवूडपासून लांब आहे. सोशल मीडियावर मात्र सतत अॅक्टीव्ह असते. जाहिरात क्षेत्रात तिने काम सुरू केलं आहे. तिच्या या कामाची तिला खूपच आवड आहे. चार वर्षापूर्वी तिचे बॉयफ्रेंड मिशाल कृपलानीसोबत ब्रेकअप झाले. मिशाल हा संगीतकार आहे. आयरा आणि मिशाल त्यांच्या कामामुळे एकमेकांना वेळ देत नव्हते हे त्यांच्या ब्रेकअपचे कारण होते असं आयरानेच तिच्या सोशल मीडियावरून सांगितले होते.
ब्रेकअप झाल्यावर आयरा नैराश्यात गेली. एखाद्या गोष्टीची प्रचंड काळजी करणे आणि त्या काळजीमध्ये इतके डुंबून जाणे की कोणतीही गोष्ट करण्यासाठी उत्साह न राहणे, एकटे एकटे वाटणे, नकारात्मक विचार मनात येणे या लक्षणांचा सामना तिला करावा लागत आहे. हा आजार सध्या इतका वाढला आहे की एंग्जाइटी म्हणजेच अतिकाळजीने आयराला अॅटॅक येतात. आयरा तिच्या पोस्टमध्ये असे म्हणतेय की, हा अॅटॅक येण्यापूर्वी खूप भीती वाटते. जास्त करून हा अॅटॅक रात्रीच्या वेळी येतो त्यामुळे अधिकच भीती वाटते.
आयरा खान तिच्या या आजारामुळे मेंटल हेल्थ संबंधित कामातही गुंतवून घेत आहे. मानसिक आजार तसेच मनोविकाराने त्रस्त असलेल्या लोकांना ती तिचे अनुभव सांगते जेणेकरून इतरांना लाभ होईल. सध्या तरी आयरा तिच्या या गंभीर आजारातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. . आयरा सध्या नुपूर शिखारेसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. या नैराश्यकाळात तिला नुपूरचा खूप आधार वाटत असल्याचे तिने सांगितले. त्यासाठी ती आनंदी कशी राहील याचा विचार अमिर खानही करत आहे. गेल्याच आठवड्यात अमिर खानने आयराचा मेकअप केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
हेही वाचा :