प्रेम, रिलेशनशिपबाबत विजय देवरकोंडा आणि अनन्या करणार मोठे खुलासे

बहुप्रतिक्षेत असलेला शो ‘कॉफी विथ करण’ सीझन 7 (watch coffee with karan) सुरु झाला आहे. खूप दिवसांनंतर सुरु झालेल्या या शोमध्ये सेलिब्रेटिंविषयी अनेक चिट-चॅट पहायला मिळणार आहे. ‘कॉफी विथ करण’च्या प्रत्येक सीझनला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असतो.
अशातच कॉफी विथ करणचा सातवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सातव्या सीझनलाही प्रेक्षकांचा उत्साह तसाच कायम असल्याचं दिसतंय. डिस्ज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या शोचे आताप्रर्यंत 3 एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या तीन भागांमध्ये आघाडीच्या कलाकारांसोबत मस्ती, धमाल, खेळ झालेले पहायला मिळाले. याशिवाय अनेक खुलासेही झाले. आता प्रेक्षकांना चौथ्या एपिसोडची प्रतिक्षा लागून आहे.
‘कॉफी विथ करण सीझन 7’ (watch coffee with karan) चांगलाच गाजत आहे. यातच चौथ्या एपिसोडच्या प्रतिक्षेत असताना चौथ्या एपिसोडचा टीजर प्रदर्शित झाला आहे. या शोचा होस्ट करण जोहरनं सीझन 7 च्या चौथ्या एपिसोडचा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये पुढील गेस्ट लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री अनन्या पांडे दिसत आहे. त्यामुळे पुढच्या भागात हे दोन कलाकार सहभाग नोंदवणार आहेत.
चौथ्या एपिसोडच्या प्रोमोवरुन अनन्या आणि विजयविषयी अनेक खुलासे होणार असल्याचं दिसतंय. त्यांची आवड, रिलेशनशीप, अशा अनेक गोष्टी समोर येणार आहेत. प्रोमो पाहून चाहते अधिक उत्सुक झाले आहेत. त्यामुळे पुढचा भाग रंजक होणार असल्याचं दिसतंय.
दरम्यान, सातव्या सीझनमध्ये आतापर्यंत आलिया भट्ट, रणवीर सिंह, सारा अली खान, जान्हवी कपूर, अक्षय कुमार, सामंथा रुथ प्रभू यांनी उपस्थिती लावली. पहिल्या तीन भागांना प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला. आता पुढच्या भागांनाहील हा प्रतिसाद कायम राहणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.