अभिनेत्याने शेअर केला पत्नीसोबत रोमँटिक फोटो..!

मराठमोळा अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय. या चॉकलेट बॉयचे चाहतेही असंख्य. मालिका, चित्रपट, वेबसीरिज या निमित्ताने उमेश सतत चर्चेत असतो. मराठी चित्रपटसृष्टीतील उमेश कामत आणि प्रिया बापट ही जोडी लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. उमेश आणि प्रिया दोघेही सोशल मीडियावर एक्टिव्ह आहेत आणि ते सोशल मीडियावर (romantic photo) फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.
उमेश नुकताच प्रिया बापटसोबतचा एक रोमाँटिक फोटो (romantic photo) सोशल मीडियावर शेअर केले आहे. फलक तक चल साथ मेरे, फलक तक चल साथ चल असं कॅप्शन त्याने या फोटोसोबत दिलं आहे. ब्युटीफुल कपल, नेहमी एकत्र छान दिसता, क्युट अशा चाहत्यांच्या कमेंट उमेशने शेअर केलेल्या या फोटोवर येतायत.
सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर प्रिया आणि उमेश लग्नबेडीत अडकले होते. प्रिया बापट आणि उमेश कामत हे एकाच इंडस्ट्रीत असल्याने खूप अगोदरपासून एकमेकांचे चांगले मित्र होते. कालांतराने दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पण प्रेम व्यक्त कोण करणार अशी अडचण होती. अखेर प्रियाने पुढाकार घेत प्रेम व्यक्त केले आणि उमेशने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी होकार दिला.
हेही वाचा :