शहनाजच्या व्हिडिओचा सोशल मीडियावर कहर..!

प्रसिद्ध अभिनेत्री शहनाज गिलने (shehnaaz gill) पोस्ट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर (instagram active) सर्वत्र व्हायरल होताना दिसतोय.’मेरा पिँड मेरे खेत’ असे कँप्शन देत शहनाजने बुधवारी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटला हा व्हिडीओ पोस्ट केलाय.तिच्या पंजाबी सूटमधील या व्हिडीओला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतोय.
बिग बॉस पासून प्रसिद्धी मिळालेली अभिनेत्री आणि गायिका शहनाज गिल ही इंस्टाग्राम वर सतत सक्रिय (instagram active) असते. चाहत्यांना तिच्या इंस्टाग्राम पोस्ट मधून सतत अपडेट्स देते. कालच तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ अपलोड केलाय.ज्यामधे पिंडमधील (पंजाबमधील) शेतांमधे ती दिसून आली.ट्रॅक्टर,विटांची घरं दाखवत तिने पंजाबचे म्हणजेच तिच्या राहत्या ठीकाणचे वर्णन ‘मेरा पिँड मेरे खेत’ अशा शब्दांत केले आहे.या पोस्टला वीस तासांत तब्बल सात लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
View this post on Instagram
शहनाज गिलचा व्हिडिओ अमरिंदर गिल यांनी गायलेल्या आणि डॉ झ्यूस यांनी संगीतबद्ध केलेल्या “चल जिंदिये” या गाण्यावर सेट केला आहे. तिने पंजाबमधील तिच्या गावात व्हिडिओ शूट केला असून व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, “मेरा पिंड… मेरे खेत (माझे गाव, माझे शेत)” असे लिहिले आहे. गायक-अभिनेत्याने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर गुरुद्वारामध्ये शूट केलेले दोन व्हिडिओसुद्धा पोस्ट केले आहेत.
बिग बॉस मधील एका एपिसोड मधे शहनाजने तिची ओळख ‘इंडिया कि कॅटरिना कैफ’ असे म्हणून नव्याने करून दिली होती. तिच्या प्रत्येक व्हिडीओ आणि पोस्ट मधून ती तिचे नवे रूप प्रेक्षकांपुढे आणण्याचा प्रयत्न करते.’सच अ बोरिंग डे(such a boaring day), साडा कुत्ता’,अशा तिच्या काही रिल्स सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाल्या होत्या. ‘मेरा पिंड मेरे खेत’ या तिच्या पंजाबी सूटमधील व्हिडिओ मधून शहनाजने पंजाब बरोबरच देश विदेशातील अनेक चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
हेही वाचा :