अभिनेत्री झाली ‘Oops’ मूमेंटची शिकार! video viral…

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) तिच्या आलिशान लाइफस्टाइल आणि फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. फॅशनविश्वात उर्वशीने स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग असून ती तिचे (live performance) ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

बुर्ज अल अरबमध्ये लाइव्ह परफॉर्म (live performance) करणारी ती पहिली भारतीय कलाकार ठरल्याची माहिती उर्वशीने नुकत्याच एका पोस्टद्वारे दिली. यावेळी तिने निळ्या रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला होता. या लाइव्ह परफॉर्मन्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र मंचावर अत्यंत आत्मविश्वासाने परफॉर्म करताना उर्वशी ‘oops’ मूमेंटची शिकार झाली. वेळीच सावरून उर्वशीने तो परफॉर्मन्स पूर्ण केला आणि प्रेक्षकांना त्याची जाणीव होऊ दिली नाही.

 

उर्वशीने बॉलिवूडमध्ये फारसे चित्रपट केले नाहीत. मात्र सौंदर्यामुळे आणि बोल्ड अंदाजामुळे ती नेहमीच प्रकाशझोतात असते. तिला ‘इंडियाज प्राइड’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. याच वेळी उर्वशीने 50 हजार प्रेक्षकांसमोर परफॉर्म केलं. या परफॉर्मन्सदरम्यान उर्वशीने एक गाणंसुद्धा गायलं असून त्याला प्रेक्षकांकडून चांगली दाद मिळाली. सेव्हन स्टार हॉटेल बुर्ज अल अरबच्या टॉप फ्लोअरवर उर्वशीने परफॉर्म केलं.

 

उर्वशीचे इन्स्टाग्रामवर साडेचार कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिने ‘मिस दिवा युनिव्हर्स 2015’चा मुकूट जिंकला होता. मिस युनिव्हर्स 2015 स्पर्धेत तिने भारताचं प्रतिनिधित्व केलं. इतरही विविध सौंदर्यस्पर्धांमध्ये उर्वशी परीक्षक म्हणून सहभागी होते. 2013 मध्ये तिने ‘सिंग साहब द ग्रेट’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ‘सनम रे’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’, ‘हेट स्टोरी 4’ आणि ‘पागलपंती’ यांसारख्या चित्रपटांमध्ये ती झळकली.

हेही वाचा :


पुढील ‘दोन दिवस’ अत्यंत महत्वाचे! राज्यावर घोंगावतय मोठ संकट..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *