अभिनेत्री बिदिशा डेचं निधन; गळफास घेत केली आत्महत्या!

काही दिवसांपूर्वी बंगाली अभिनेत्री पल्लवी डे (Pallavi Day) हिने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. तिच्या निधनानं बंगाली चित्रपटसृष्टीमध्ये खळबळ माजली होती. आता बंगाली अभिनेत्री आणि मॉडेल असणाऱ्या बिदिशा डेनं  देखील आत्महत्या केली आहे. तिच्या मृत्यूनं अनेकांना धक्का बसला आहे.

कोलकाता येथील नगर बाजारमध्ये बिदिशा ही भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहायची आणि तिथेच तिने आत्महत्या (Suicide) केली. बुधवारी संध्याकाळी पोलिसांना बिदिशा डेचा मृतदेह तिच्या फ्लॅमधील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. फ्लॅटचा दरवाजा आतून बंद होता, तो तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला आणि त्यानंतर बिदिशाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

रिपोर्टनुसार, बिदिशा चार महिन्यांपूर्वीच नागर बाजारमध्ये शिफ्ट झाली होती. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. एका रिपोर्टनुसार, बिदिशाच्या घरातून पोलिसांना एक सुसाईड नोट देखील सापडली आहे.

बिदिशाच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ती तिच्या बॉयफ्रेंडमुळे डिप्रेशनमध्ये होती. बिदिशाची जवळची मैत्रीण दिया दास हिने सांगितले की, ती डिप्रेशनमध्ये होती. बिदिशाचा बॉयफ्रेंड अनुभ याच्या आणखी 3 गर्लफ्रेंड्स होत्या. बिदिशा ही त्याला इतर मुलींसोबत शकत नव्हती. या प्रकरणामुळे ती डिप्रेशनमध्ये होती.

बिदिशाने 2021 मध्ये अनिरबेद चट्टोपाध्याय दिग्दर्शित ‘भार- द क्लाउन’ या लघुपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. तर लोकप्रिय अभिनेता देबराज मुखर्जीनं या शॉर्ट फिल्ममध्ये मुख्य भूमिका साकारली होती.

हेही वाचा :


राज्य मंत्रिमंडळाचे ३ महत्त्वपूर्ण निर्णय!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *