ब्लॅक कलरच्या स्वीमसूटमध्ये अभिनेत्री पुलाच्या पाण्यात..!

माझ्या नवऱ्याची बायको फेम रसिका सुनीलने (Rasika) आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत ती ब्लॅक कलरचा स्वीमसूट (swimsuit) घालून पुलामध्ये पोहत असताना दिसतेय. खरंतरं हा व्हिडिओ मालदीवमदील आहे. मालदीवमध्ये व्हेकेशनला गेलेल्या रसिकाने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामला शेअर केलाय. तिने या व्हिडिओला No one knows how far I’ll go when it comes to the ocean ❤️ अशी कॅप्शन लिहिलीय. (Rasika)

याआधी तिने तिचा पती आदित्य बिलागीसोबत एक फोटो शेअर करत गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तिने यासोबत कॅप्शन लिहिली होती- Pahila long distance Gudi padva ♥️ Saglyanna nutan varshachya khup shubheccha 🙏🏼(swimsuit)

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत रसिकाने शनायाची भूमिका साकारली होती. तिने तिचा बॉयफ्रेंड आदित्य बिलागीशी लग्नगाठ बांधली. गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर १८ ऑक्टोबर, २०२१ रोजी हा विवाह सोहळा पार पडला होता.

रसिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका सोडून परदेशात गेली होती. लॉस एंजिलिसला जाऊन तिने पुढचं शिक्षण घेतलं. तिथे तिची ओळख आदित्यशी झाली. मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. आदित्य बिलागीच्या इन्स्टाग्रामच्या पोस्टनुसार तो सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. डान्सर आणि कोरिओग्राफर आहे. तो लॉस एंजेलिसमध्ये राहतो. याआधी रसिकाने युएसमधून फिल्ममेकिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

रसिकाने रिलेशनशीपविषयी केला होता खुलासा
होय, मी आदित्य बिलागीला डेट करतेय. आम्ही दोघंही सध्या लॉस एंजिलिसमध्ये आहोत आणि एकमेकांसोबत वेळ घालवत आहोत. मी खूप आनंदी आहे. असे म्हणत रसिकाने आदित्य बिलागीशी असलेल्या रिलेशनशीपविषयी खुलासा केला होता.

हेही वाचा :


सांगलीमध्ये भीषण अपघात..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *