‘स्त्री’ जन्माविषयी अभिनेत्रीनं केलं धक्कादायक वक्तव्य..!

ज्यांच्या घरी मुलीचा जन्म होतो,ते खूप भाग्यवान असं म्हटलं जातं. मुलगी जन्माला आली म्हणजे घरी लक्ष्मी आली असं म्हणतात. पण आजही जगात अशी लोकं आहेत जे मुलींना ओझं मानतात. आता हे केवळ गरीब,मध्यमवर्गीत कुटुंबातच घडतं असा समज पूर्ण चुकीचा आहे बरं का. अगदी नावाजलेल्या मोठ्या घरंदाज घरातही मुलीच्या जन्मावर नाकं मुरडणारी बक्कळ लोकं आहेत. आता यात एका अभिनेत्रीचा (pakistani actor) देखील समावेश झाला आहे. पाकिस्तानी अभिनेत्री साहिबा अफजल (Sahiba Afzal)असं त्या पाक अभिनेत्रीचं नाव आहे.

साहिबा अफजलनं मुलीच्या जन्मावरनं एक वादग्रस्त विधान केलंय,ज्यावरनं आता उलट-सुलट चर्चा रंगलेली दिसून येत आहे. साहिबाला तिच्या या वक्त्व्यावरनं खूप ट्रोलही केलं जात आहे. पाकिस्तानी नेटकरीचं नाही तर तिथल्या सेलिब्रिटींनीही तिच्या त्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. साहिबानं नेमकं मुलीच्या जन्मावरुन काय भाष्य केलं आहे ज्यावरनं इतकी वादग्रस्त चर्चा रंगलीय ते सुरुवातीला जाणून घेऊया. सेलिब्रिटी कपल अफजल खान आणि पत्नी साहिबा अफजल आपल्या दोन्ही मुलांसोबत निदा यासिरच्या एका मॉर्निंग शो मध्ये सहभागी झाले होते. या शो मध्ये (pakistani actor) साहिबानं आपल्या मुलांविषयी बोलताना एक धक्कादायक वक्तव्य केलं. ती म्हणाली की,”मला मुलगी व्हावी असं कधीच वाटलं नाही. साहिबानं यासाठी स्वतःला भाग्यशाली समजलं की तिला मुलगी नाही आहे. तर आपल्याला दोन्ही मुलगे आहेत”. साहिबाच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पती अफजल खान म्हणाले की,”जेव्हा मी माझ्या मित्रपरिवारातील शान शाहिद आणि सौद युसुफ यांचं त्यांच्या दोन्ही मुलींशी असलेलं बॉंड पाहतो तेव्हा मलाही एक मुलगी हवी होती असं वाटतं”.

यानंतर साहिबा लगेच म्हणाली,”मला मुलगी व्हावी असं वाटत नाही. कारण जगात महिलांना खूप कमी अधिकार आहेत,त्या स्वतःच्या आवडीची गोष्ट करु शकत नाहीत. त्यांना नेहमीच आपल्या भविष्याविषयीची चिंता असते. म्हणून मला नेहमीच मुलगा हवा होता. मी देवाचे आभार मानते की,त्यानं मला मुलगी नाही दिली,कारण मुलींवर खुप दडपण असतं. त्या पूर्ण आयुष्यभर दुसऱ्यांच्या मनाप्रमाणेच जगतात. लग्नाआधी पालकांचं मन सांभाळा,त्यांचं ऐका आणि लग्नानंतर नवऱ्याचं. मुलींना आपल्या इच्छा नसतातच कधी,ना त्यांचं आयुष्य त्याचं स्वतःचं असतं”.

मुलाखतीतील या वक्तव्यानंतर साहिबाला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जात आहे. जेव्हा तिला मुलांना कशी सुन हवी याविषयी विचारलं तर तिचं उत्तर कहर करणारं होतं. ती म्हणाली, ”माझ्या मुलांना मला उंच,गोरी आणि सडपातळ बांधा असलेली मुलगी हवी आहे. साहिबाच्या या वक्तव्यावर पाकिस्तानी अभिनेता मोहम्मर राणाच्या पत्नीनं प्रतिक्रिया दिली आहे. तिनं साहिबाच्या विरोधात पोस्ट करत म्हटलं आहे की,”मुली देवाचा आशिर्वाद असतात,आणि आशिर्वाद कधीच ओझं नसतं”. दुसऱ्या आणखी एका पोस्टमध्ये मेहनाजनं लिहिलं आहे,”ती स्त्री लकी आहे जिच्या पोटी पहिली मुलगी जन्माला आली आहे. मी खूप भाग्यवान आहे की माझ्या दो मुली आहेत”. साहिबाच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानमध्ये सध्या टीकेचा सूर उमटलाय. आणि तो सूर आता सोशल मीडियाच्या माध्यमातून इतर देशांतूनही उमटला तर नवल नव्हे.

हेही वाचा :


आदित्य ठाकरे यांनी केली मोठी घोषणा..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *