मंदिरात जाताना अभिनेत्रीच्या गाडीचा ब्रेक फेल, गंभीर जखमी..!

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मलायका अरोराच्या गाडीला अपघात झाला होता. मलायकानंतर आता आपल्या सौंदर्याने सर्वांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta)चा अपघात झाला आहे. एक काळ होता जेव्हा तनुश्री प्रसिद्ध चेहऱ्यांपैकी एक होती, पण आता ती बॉलिवूडपासून दूर आहे. पण सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या तनुश्रीने काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

तनुश्री मंदिरात जात असताना तिच्या कारचा ब्रेक फेल झाला, या अपघातात तनुश्री (Tanushree Dutta) जखमी देखील झाली आहे. मंदिरातील आणि अपघाताचे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये घडला प्रकार देखील चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

तनुश्री म्हणते, ‘आजचा दिवस एडवेंचरस होता… महाकालच्या दर्शनासाठी मंदिरात पोहोचली. दर्शनासाठी जात असताना एक दुर्घटना घडली… ब्रेक फेल झाल्यानंतर कार धडकली… अपघातात मी जखमी झाली आहे… टाके लागले आहेत… जय श्री महाकाल!’

तनुश्रीची पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तनुश्रीचे फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. तनुश्रीने 2005 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

तनुश्री दत्ताने पहिल्यांदा ‘आशिक बनाया आपने’ सिनेमात काम केले होते. सिनेमात ती अभिनेता इमरान हाश्मीसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. एवढंच नाही तर #Metoo मोहिमेच्या माध्यमातून तिने झगमगत्या विश्वातील अनेक काळे सत्य समोर आणले.

हेही वाचा :


सांगलीत तरुणीचा विनयभंग ; दोघे ताब्यात..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *