Alia bhatt ला लग्नाच्या शुभेच्छा देणं सिद्धार्थला पडलं महागात, कारण…

marriage

अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांनी 14 एप्रिल रोजी लग्न (marriage) करून आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचं वचन दिलं. दोघांनीही लग्न अत्यंत गुपित ठेवलं. लग्न झाल्यानंतर अनेकांनी तिला नव्या आयुष्याच्या शुभेच्छा देखील दिल्या. चाहते, कुटुंब आणि मित्र परिवारानेचं नाही, तर रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंड्सने देखील अभिनेत्याला शुभेच्छा दिल्या.

आलियाचा एक्स बॉयफ्रेंड आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने देखील अभिनेत्रीला नव्या आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण सोशल मीडियावर आलियाला लग्नाच्या (marriage) शुभेच्छा देणं  अभिनेत्याला महागात पडलं आहे. कारण सोशल मीडियावर त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

सिद्धार्थने आलियाला लग्नानंतर, ‘दोघांना शुभेच्छा… खूप प्रेम आणि आनंद…’  अशा शुभेच्छा दिल्या… त्यानंतर अनेक युजर्सने कमेंटमध्ये, ‘तू कियारा आडवणीसोबत लग्न कर…’, अन्य युजरने, ‘आम्ही तुझ्या आणि कियाराच्या लग्नाच्या प्रतीक्षेत आहोत..’ असं लिहिलं आहे.

दरम्यान, लग्नानंतर फक्त आलियाच्या एक्स बॉयफ्रेंडने नाही तर, रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि कतरिना कैफने देखील दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

सध्या आलिया आणि रणबीरचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर लग्न बंधनात अडकले… लग्न झाल्यानंतर मिसेस आणि मिस्टर कपूर जेव्हा सर्वांसमोर आले.. तेव्हा दोघांना पाहून फक्त त्यांच्या चाहत्यांचं नाही, तर प्रत्येकाला प्रचंड आनंद झाला…

Smart News:-

पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते मारुती मंदिरात महाआरती आणि हनुमान चालीसाचे पठण


‘मी त्यांच्याकडे पाहातच नाही !’, आदित्य ठाकरेंचा टोला


विद्यार्थ्यांनो, लवकरच जारी होणार ICSE परीक्षेचं हॉल तिकीट


राज ठाकरेंनी भोंग्यांऐवजी विकासाच्या मुद्दावर बोलाव; -भाजप उपाध्यक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *