श्रद्धा कपूरच्या ब्रेकअपचं कारण अखेर समोर..!

reactions

अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि तिचा प्रियकर छायाचित्रकार रोहन श्रेष्ठा यांच्या नात्यात दुरावा आला आहे.  लग्नाची चर्चा सुरू असताना दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्यामुळे कपूर कुटुंबाला आणि श्रद्धाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ब्रेकअपनंतर आता दोघांच्या प्रतिक्रिया देखील समोर आल्या आहेत. ब्रेकअपनंतर दोघांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर (reactions) चाहत्यांची मात्र निराशा झाली आहे.

ब्रेकअपच्या चर्चा रंगल्यानंतर श्रद्धाकपूरने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘आणखी ऐकवा….’ असं लिहिलं आहे. तर एका वेब पोर्टलने रोहनला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रोहन म्हणाला, ‘मला माझ्या खासगी आयुष्याबद्दल काही बोलायचं नाही…'(reactions)

चार वर्षांचं नातं तुटलं…

श्रद्धानं भलेही तिचं आणि रोहनचं नातं जाहिरपणे स्वीकारलं नाही, पण त्यांच्यात असणारी ‘खास’ मैत्री खूपच बोलकी ठरली. हे दोघंही एकमेकांना महाविद्यालयीन दिवसांपासून ओळखत आहेत.

reactions

इतकंच काय, तर आता त्यांनी लग्नाचा निर्णयही घेतल्याचं कळलं. पण, आता मात्र त्या दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार जानेवारी महिन्यापासूनचं त्यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.

श्रद्धाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनवेळी रोहन गोव्यातही अनुपस्थित होता. म्हणून दोघांचं ब्रेकअप झालं आसल्याचं सांगण्यात येत आहे. पण हेच त्यांच्या विभक्त होण्यामागे खरं कारण आहे का? हे अद्याप समोप येवू शकलं नाही.

फेब्रुवारी महिन्यात त्यांनी अखेर हा मोठा निर्णय घेत आता अखेर आपआपले वेगळे मार्ग निवडले आहेत. पण, प्रेमाच्या या प्रवासाच जिथं नव्या सुरुवातीची स्वप्न पाहिली जातात तिथंच पोहोचून विभक्त होण्याचं दुर्दैव कोणाच्याही नशिबी येऊ नये हेच खरं….

हेही वाचा :


मोफत रेशन योजनेबाबत मोठा निर्णय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *