अक्षयकुमारचा बहुप्रतिक्षित ‘पृथ्वीराज’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज…

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘पृथ्वीराज’चित्रपटामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचे पोस्टर, टीझर प्रदर्शित झाल्यापासून अनेक चाहते (trailer) ट्रेलरची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहे. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाद्वारे मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्रामद्वारे या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शित झाल्याची घोषणा केली आहे. शौर्य आणि पराक्रमाची अजरामर गाथा…सम्राट पृथ्वीराज चौहान यांची कथा, असे कॅप्शन देत अक्षयने हा व्हिडीओ शेअर केला आहे.(trailer)

या चित्रपटाचा ट्रेलर 2 मिनिट 53 सेकेंदाचा आहे. या ट्रेलरची सुरुवात १२ व्या शतकापासून सुरु होते. यात पृथ्वीराज चौहानच्या भूमिकेत अक्षय कुमार दिसत आहे. यात पृथ्वीराज चौहान यांनी शौर्याने युद्धे कशी जिंकली आणि दिल्लीची सुल्तानी कशी मिळवली हे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात पृथ्वीराज चौहान आणि मोहम्मद घोरी यांच्यातील लढाईचे दृश्यही पाहायला मिळत आहे.

या चित्रपटात अक्षय कुमार हा पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त मानुषी छिल्लर, सोनू सूद आणि संजय दत्त देखील महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. या चित्रपटाद्वारे सम्राट पृथ्वीराज चौहान यांची जीवनगाथा मोठ्या पडद्यावर साकारली जाणार आहे. येत्या ३ जून २०२२ रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :


कोल्हापुरमध्ये घरगुती गॅस सिंलेडरच्या दरवाढ विरोधात अनोखं आंदोलन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *