FILMFARE च्या कव्हर पेजवर झळकली मराठमोळी अभिनेत्री
विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ (Chandrakmukhi ) या कादंबरीवर आधारित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात नृत्यांगणेची प्रमुख भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar on filmfare page) साकारत आहे. तर दौलत देशमानेच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे झळकणार आहे. अमृता खानविलकरचे या चित्रपटासाठी विशेष कौतुक केले जात आहे. आता आणखी एका गोष्टीमुळं अमृता चर्चेत आली आहे.
‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओकने केले आहे. आता प्रसाद ओकनं अमृताचा फोटो शेअर करत एक खास गोष्ट चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ही गोष्ट खरं तर अभिमान वाटावी अशीच आहे. प्रसाद ओकनं पोस्टमध्ये म्हटलं आहे की, अभिमान* *प्रेम* *अभिनंदन* filmfare च्या डिजिटल मुखपृष्ठावर झळकणारी पहिली अभिनेत्री तू ठरली आहेस अमृतायाचा प्रचंड प्रचंड *अभिमान* वाटतोय.
तुझे कष्ट, तुझी जिद्द, तुझी चिकाटी गेली दोन अडीच वर्ष जवळून बघतोय. त्यासाठी तुला खूप खूप *प्रेम* हा बहुमान तुला मिळाला याबद्दल तुझं खूप खूप खूप *अभिनंदन*आपली #चंद्रा ठरली आहे FILMFARE च्या DIGITAL COVER PAGE वरझळकणारी “पहिली मराठी अभिनेत्री” प्रसाद ओकच्या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.प्रसाद ओकच्या या पोस्टवर कमेंट करत अमृताने प्रसाद ओकचे आभार मानले आहे. यासोबत मंजिरी ओके, आदिनाथ कोठारे यांनी देखील अमृताचं अभिनंदन केलं आहे.
‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओकने तर पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. या चित्रपटात दमदार दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार आहे. तर चंद्राच्या भूमिकेत अमृता खानविलकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाला अजय -अतुल यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे.
हेही वाचा :