अनुष्काचं ग्लॅमरस फोटोशूट; फोटो पाहून ‘विराट’सह चाहते क्लीनबोल्ड!

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने नुकतचं एका मॅगझीनसाठी फोटोशूट केले आहे. अनुष्काच्या या (photoshoot) फोटोशूटमध्ये अतिशय सुंदर दिसतेय. तिचे हे फोटोशूट पाहून चाहते घायाळ झालेत. विराट सूद्धा या फोटोशूटवर कमेंट करण्यास स्वत:ला रोखू शकला नाही आहे. या फोटोशूटचा चर्चा आता सोशल मीडियावर रंगलीय.

अनुष्काने एका खास मॅगझिनसाठी फोटोशूट (photoshoot) केलं. हे फोटो बाजार इंडियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये, अनुष्काने Panthre de Cartier Rings, Cartier आणि Ermenegildo Zegna चा किमोनो पँट-सूट घातलाय. हा रंग तिच्यावर खूप खुलून दिसत आहे.अनुष्काचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या पोस्टवर चाहते तिच्या सूंदरतेचे कौतूक करतायत.

विराट काय म्हणाला ?
पत्नी अनुष्का शर्माच्या मॅगझिन फोटोशूटवर विराट कोहलीनेही कमेंट केली आहे. विराटने Gorgeous असे कमेंट अनुष्काच्या फोटोवर केले आहे. तसेच विराट व्यतिरिक्त नताशा पूनावाला आणि अथिया शेट्टीने तिला स्टनिंग म्हटलेय. तर रिया कपूरने फायर इमोजी पोस्ट केली आहे.

photoshoot

आगामी चित्रपट

अनुष्का शर्मा लवकरच चकडा एक्सप्रेस मधून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. हा चित्रपट क्रिकेटर झुलन गोस्वामीचा बायोपिक आहे. प्रोसित रॉय या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी अनुष्काने खूप मेहनत घेतली आहे.

हेही वाचा :


LIC IPO : स्वस्तात शेअर्सची खरेदी करा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *