Video:अभिनेत्री घेत आहे बॅटिंग आणि बाॅलिंगचे धडे..!पाहिलं का ?

बॉलिवूडमधील अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) तिच्या कमबॅकसाठी सज्ज झाली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार खेळाडू झुलन गोस्वामी हिच्या आयुष्यावरील ‘चकदा एक्स्प्रेस’ सिनेमात अनुष्का दिसणार आहे. या सिनेमासाठी अनुष्का कठोर मेहनत घेताना दिसत आहे. अलिकडेच अनुष्कानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती क्रिकेटच्या मैदानावर बॉलिंगची प्रॅक्टिस करताना दिसत आहे.
अनुष्काचा व्हिडिओ
अनुष्कानं (Anushka Sharma) तिच्या इन्स्टाग्रामवर क्रिकेटच्या मैदानावर बॉलिंगची प्रॅक्टिस करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिनं गेट स्वेट गो असं लिहिलं आहे. या पोस्टमध्ये तिनं पुढं असं म्हटलं आहे की, ‘ चकदा एक्स्प्रेससाठीची तयारी दिवसागणिक कठीण आणि कठोर होत चालली आहे.’
अनुष्कानं शेअर केलेल्या या व्हिडओला पाच लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. अनेक युझर्सनी यावर कॉमेन्ट केल्या आहेत. एका युझरनं लिहिलं आहे की, ‘हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता आहे.’ तर आणखी एका युझरनं लिहिलं आहे, ‘गो गर्ल’. या व्हिडिओमध्ये अनुष्का शर्मा बॅटिंग आणि बॉलिंग करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये अनुष्काने ब्लॅक टीशर्ट आणि ट्राउजर घातली आहे.
या सिनेमात अनुष्का शर्मा भारतीय क्रिकेट संघाची माजी कर्णधार झुलन गोस्वामी साकारणार आहे. अनुष्काचा फर्स्ट लूक पाहून चाहते प्रचंड उत्सुक झाले आहेत. लवकरच या सिनेमाचं चित्रीकरण सुरू होणार आहे. अनुष्काचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
अनुष्काचं कमबॅक
आई झाल्यानंतर ‘चकदा एक्सप्रेस’ हा अनुष्काचा पहिला सिनेमा आहे. या सिनेमातून अनुष्का शर्मा तब्बल तीन वर्षानंतर पडद्यावर कमबॅक करत आहे. त्यामुळे चाहत्यांसाठी हा सुखद धक्का आहे.
हेही वाचा :