जखमांच्या व्रणांनी अभिनेत्रींच्या सौंदर्यावर डाग…

बॉलिवूड- कलाजगतामध्ये (art world) काम करणाऱ्या अभिनेत्रींसाठी त्यांच्या आरोग्यासोबतच त्यांच्या चेहऱ्याच्या सौंदर्याची काळजी घेतली जाणंही तितकंच महत्त्वाचं. वेळोवेळी त्वचेची, सौंदर्याची काळजी घेणाऱ्या अशाच काही अभिनेत्रींना अपघात असो किंवा मग आणखी कोणत्या प्रसंगाचा सामना करावा लागला, ज्यामुळं थेट त्यांच्या चेहऱ्यालाच दुखापत झाली.
चेहऱ्यावरील दुखापती बऱ्या झाल्या असल्या तरीही त्याचे व्रण मात्र अद्यापही कायमच आहेत. त्यामुळं जेव्हा केव्हा कॅमेरा क्लोजअप शॉटसाठी रोल होतो तेव्हा प्रत्येक वेळी या जखमा नव्यानं समोर येताना दिसतात.(art world)
आठवतंय का, अशा कोणत्या अभिनेत्री आहेत ज्यांच्या चेहऱ्यावर असे व्रण तुम्हालाही दिसले ?
‘मणिकर्णिका’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी तलवारबाजीच्या स्टंटच्या वेळी कंगनाच्या चेहऱ्याला तलवार लागली होती. आजही त्या जखमेचा व्रण तिच्या चेहऱ्यावर कायम दिसतो.
हल्लीच अभिनेत्री मलायका अरोरा हीचा मुंबई – पुणे महामार्गावर एक अपघात झाला. या अपघातात तिच्या कपाळाच्या भागात जखम झाली. मेकअप केल्यानंतरही मलायकाच्या चेहऱ्यावर व्रण मात्र कायम दिसतात.
अभिनेत्री निशा रावल हीचा दुखापतग्रस्त चेहरा तेव्हा जगमासमोर आला, जेव्हा तिनं पती, अभिनेता करण मेहरा याच्यावर मारहाणीचे गंभीर आरोप केले होते. करणनं आपल्याला इतक्या वाईटपणे मारलं की चेहऱ्याला दुखापत होऊन रक्तस्त्रावही सुरु झाला होता. आज निशा मेकअपच्या मदतीनं तिच्या चेहऱ्यावरील हे व्रण लपवताना दिसते.
अभिनेत्री हेमा मालिनी यांचासुद्धा भीषण अपगात झाला होता. ज्यानंतर त्यांचाचेहरा बराच बदलला. असंही म्हटलं जातं की त्यांनी जखमांचे व्रण लपवण्यासाठी प्लास्टीक सर्जरी केली.
हेही वाचा :