आशा भोसले यांच्यावर पुन्हा एकदा कोसळला दुःखाचा डोंगर..!

ज्येष्ठ गायिका आशा भोसले (asha bhosle) यांना अचानक दुबईत रवाना व्हावे लागले आहेत,. त्यांच्यावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही महिन्यापूर्वीच आशा यांच्या मोठ्या भगिनी ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचे निधन झाले. या निधनाने मोठा धक्का आशा भोसले यांना बसला होता. काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात आशा भोसले लता दीदींविषयी बोलताना भावुक झाल्या. त्यांना अश्रू अनावर झाले. अत्यंत कठीण प्रसंगातून त्या जात असतानाच आता मुलांच्या प्रकृतीची काळजी त्यांना सतावत आहे.
आशा भोसले (asha bhosle) यांचा धाकटा मुलगा आनंद भोसले याला दुबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आहे. आनंद अचानक बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळले. यात त्यांना किरकोळ दुखापतही झाली. आनंद यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. परंतु सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना जनरल वॉर्ड मध्ये आणले असल्याची माहिती काही माध्यमांनी दिली आहे. त्यांच्या प्रकृतीची वार्ता समजताच आशा भोसले दुबईत गेल्या. सध्या आशाताई मुलासोबतच असून त्यांची काळजी घेत आहेत.
आशा भोसले यांना तीन मुले आहेत. आशाताईंचा मोठा मुलगा हेमंत भोसले यांचं वयाच्या ६६ व्या वर्षी कर्करोगाने निधन झालं. हेमंत हे निधनाच्यावेळी स्कॉटलंडमध्ये रहात होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हेमंत भोसले यांनी अनेक चित्रपटांसाठी गाणी रचली आणि संगीत नाटक अकादमीपासून फिल्मफेअर आणि २ राष्ट्रीय पुरस्कारही जिंकले होते. २०१२ मध्ये आशा भोसले यांची मुलगी वर्षा यांनी आत्महत्त्या केली. वर्षा भोसले यांनी घरातील परवानाधारक पिस्तुलाने स्वतावर गोळ्या झाडून घेतल्या होत्या. डिप्रेशनमध्ये येऊन त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जातं.
दोन मुले गमावल्याने आशा भोसले यांना आनंद यांची विशेष चिंता सतावत असते. आनंद भोसले हे व्यवसायिक आहेत शिवाय ते चित्रपट दिग्दर्शन करतात. आनंद यांना अचानक चक्कर आल्याने आशा भोसले यांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे. ही चक्कर नेमकी कशामुळे आली, काय झाले, याचे तपशील अद्याप मिळालेले नाही.
हेही वाचा :