उर्फीने केला असा लूक की, पाहणारेही चक्रावले..!

अतरंगी उर्फी जावेद नेहमीच तिच्या विचित्र फॅशनमुळे (fashion) चर्चेत असते. तिचे अतरंगी कपडे सर्वात मोठा चर्चेचा विषय असतो. तिने केलेली फॅशन ही युनिक ठरते. अनेकदा ती असे कपडे घालते की, ते पाहून अनेक लोकांना प्रश्न पडतो क, हिचे कपडे शिवतो कोण? आता तर ती एका वेगळ्याच कारमामुळे चर्चेत आलीय. तिने कपड्यांच्या जागी दुसरी वस्तू लावल्याने तिच्या फॅशनची चर्चा होताना दिसतेय.
तिच्या आउटफिटमुळे (fashion) तिला काही नेटकऱ्यांकडून ट्रोलिंगलादेखील सामोरं जावं लागलं आहे. यावेळीही असेच काहीसे घडले. यावेळी उर्फीचा नवा लूक भांबावणारा आहे. यावेळी उर्फीने कपड्यांव्यतिरिक्त काय लावलंय पाहा.
तिने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फीने शरीर फोटोंनी जाकले आहे. तिने कपड्यांच्या जागी अनेक फोटो चिटकवल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तिने या व्हिडिओला कॅप्शन लिहिले आहे.
बिग बॉसमधून मिळाली प्रसिध्दी
बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनपासून उर्फी जावेद खूप प्रसिद्ध झाली आहे. याआधीही त्याने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले असले तरी खरी ओळख बिग बॉसने दिली. उर्फीने लहान वयातच अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. २०१६ मध्ये तिला बडे भैया की दुल्हनिया या मालिकेत अवनी पंतची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. यानंतर त्यांनी ये रिश्ता क्या कहलाता है, कसौटी जिंदगी की आणि चंद्र नंदिनी यांसारख्या लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये काम केले. दरम्यान, उर्फीचे अनेक म्युझिक व्हिडिओ देखील रिलीज झाले आहेत.
हेही वाचा :