बाबूजी धीरे चलना म्हणत अभिनेत्रीचं “अप्रतिम” photoshoot..

महाराष्ट्राची हास्यजत्रामधून आपल्या अँकरिंगने सर्वांना वेड लावणारी प्राजक्ता माळी सध्या चर्चेत आहे. या मराठमोळ्या अभिनेत्रीचे नवे फोटोशूट (Prajaktta Mali Photoshoot) व्हायरल झाले आहे. प्राजक्ताने हे फोटो आपल्या फेसबूक पेजवर शेअर केले आहेत. पण, तिने लिहिलेल्या फोटो कॅप्शनची चर्चा मात्र खूप रंगलीय. (Prajaktta Mali Photoshoot)

तिने काही सुंदर फोटो फेसबूक आणि इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. बाबूजी धीरे चलना… प्यार में जरा…अशी कॅप्शन तिने या फोटोंना लिहिलेली दिसते. त्यावरून तिच्या चाहत्यांनी या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केलेला दिसतो. या फोटोंमध्ये ती खूपचं आकर्षक दिसतेय. तिचा मेकअप madhura deokute ने केलाय. याचं क्रेडिट देखील तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्या-त्या व्यक्तींना दिलाय.

सालस, निखळ सौंदर्य असणाऱ्या या प्राजक्ताच्या फोटोंना खूप साऱ्या कमेंट्स पाहायला मिळताहेत. नेटकऱ्यांनी काय काय म्हटलंय पाहा- प्राजुजी धीरे चलना… आपके प्यार में गिरने से संभालना, चालायचं संबंधच येत नाही मी तुझ्या प्रेमात पडलोय..!😍, Classic eyes😍, Agaaaaaai western…. English zalai ki aaj.. aikanasa vatt 😍😍😮, Thanks mam wallpaper sathi navin photo pathvlay baddal.❤️, धीरे ही चल रहे है car बेच ke bicycle ली हे , और कितना धीरे चले😂😂.

दरम्यान, चंद्रमुखीच्या गाण्यावर प्राजक्ता मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरसोबत थिकरलीय.

 

 

बाई गं…
कस करमत न्हाई गं…
बाण उरी बसला…
कृष्णसखा दिसला…
बाई बाई बाई गं… ♥️

म्हणत तिने निळ्या साडीतील फोटोदेखील शेअर केले आहेत. प्राजक्ता चक्क या गाण्याच्या प्रेमात पडलेय. चंद्रमुखी २९ एप्रिलला रिलीज होतोय.

हेही वाचा :


तुम्ही ही बुलेट चे चाहते आहात का? मग ही बातमी वाचाच..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *