बाहुबली’ बाळ! ‘जेल’ तोडून दोन कैद्यांना केले फरार;

सोशल मीडियावर (Social media) अनेकदा लहान मुलांच्या खोडकरपणाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकजण आपल्या घरांमध्ये मुलांसाठी स्पेशल ‘प्लेइंग एरिया'(खेळण्यासाठी जागा) बनवतात.

तिथे मूलं आरामात खेळू शकतात, पण काही मुले अशा ठिकाणातूनही बाहेर पडतात. अशाच प्रकारचा एक मजेशीर व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये(Social media) दिसत आहे की, मुले घरात इकडे-तिकडे जाऊ नयेत म्हणून पालकांनी त्यांना एका पाईपच्या चौकोनात बसवले. त्या चौकोनात तीन मुले आहेत. प्लॅस्टिक पाईपचा तो चौकोन त्या मुलांसाठी एखाद्या तुरुंगाप्रमाणे आहे. यातून त्या मुलांना बाहेर पडणे अवघड दिसत आहे. पण, तितक्यात त्या तिघांपैकी एक खोडकर मुल त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधतो.

मुलाला दिली ‘बाहुबली’ची उपमा
व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक लहान मुल त्याच्या हाताने शक्ती लावून तो पाईपचा ‘जेल सारखा प्रोप’ उचलतो. यानंतर आतमध्ये खेळणारी दोन्ही मुले बाहेर पडतात. त्या मुलांचा हा खोडकरपणा घरातील एक सदस्य आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड करतो. हा व्हिडिओ व्हायरलहॉग नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून यूजर्स त्या मुलाला ‘बाहुबली’ म्हणत आहेत.

Smart News:-

सुजात आंबेडकरांचं राज ठाकरेंना ओपन चॅलेंज,


आज चेन्नई विरुद्ध पंजाबचा सामना; अशी असू शकते Playing XI


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *