बिअर तर महाग होणार! कच्च्या मालाच्या किमतीत वाढ, मद्यप्रेमींना झळ

Beer

जवळपास सर्वच क्षेत्रांना महागाईची झळ सोसावी लागत आहे. त्याला कुठलेही क्षेत्र अपवाद ठरलेले नाही. आता बिअरच्या (Beer) दरातही वाढ करण्यात येणार असल्याचे कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे.

बिअर बनविण्यासाठी लागलेल्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यानं ही दरवाढ करण्यात येत असल्याचे कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे. बिअर बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल, बार्ली, ग्लास, पॅकेजिंग सामान आदींच्या किमतीत मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे बिअरच्या रेटमध्ये वाढ करण्यात येत असल्याचे कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे. एका रिपोर्टनुसार, गेल्या तीन महिन्यांमध्ये बार्लीच्या दरात दुपटीनं वाढ झाली आहे. या शिवाय लेबल, कार्टन, आणि बोटल क्राउनमध्ये 25 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. या सर्वांची गोळाबेरीज करुन कंपन्यांनी बिअरच्या(Beer) किमतीत वाढ करण्याचे ठरविले आहे.

काचेच्या बाटल्यांच्या किमतीत वाढ

ग्लास बनविणाऱ्या कंपन्यांनी गेल्या तीन महिन्यांमध्ये काचेच्या बाटल्यांच्या किमतीत वाढ केली आहे. याचाही परिणाम बिअरच्या किमतींवर बघितला जाउ शकतो. DeVANS मॉडर्न ब्रूअरीजचे एमडी प्रेम दीवान यांच्या माध्यमातून ‘मनीकंट्रोल’मध्ये लिहण्यात आलेय, की कंपनीच्या समोर आता किंमत वाढविणे असेच डिस्काउंटला कमी करण्याचाच पर्याय शिल्लक राहिला आहे. DeVANS मॉडर्न ब्रूअरीज बीअरचे प्रसिध्द ब्रॅंड गॉडफादर, कोसबर्ग पिल्स आणि सिक्स फील्डस बनवतात.

या ठिकाणी वाढतील बिअरच्या किमती

DeVANS मॉडर्न ब्रूअरीजचे एमडी प्रेम दीवान यांनी सांगितले, की कदाचित या निर्णयाचा रिटेल रेटवर लगेच परिणाम होणार नाही. परंतु स्वस्त ब्रॅंडच्या बिअरच्या पुरवठ्यावर याचा जास्त परिणाम होउ शकतो. दुसरीकडे बिअर बनविणाऱ्या कंपन्या जसे, युनाइटेड ब्रूअरीज आणि बी९ बीवरेज देखील आपल्या ब्रॅंडच्या किमतींमध्ये वाढ करु शकतात. या कंपन्या क्राफ्ट बिअर बीरा ९१ आदी बीअरची निर्मिती करीत असतात. रिपोर्टनुसार, दिल्ली, राजस्क्षान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश तसेच इतर लहान राज्यांमध्ये बिअरच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली.

मागणीत मोठी वाढ

भारतात अल्कोहोलच्या किमती राज्य सरकारे ठरवित असतात. त्यामुळे त्याची वाढ करावी की घट, याबाबत कंपन्या राज्य सरकारशी सल्लामसलत करीत असतात. राज्य सरकारांना ब्रूअरी आणि डिस्टीलरपासून मोठ्या प्रमाणात महसुली उत्पन्न मिळत असते. दारुचे भाव सर्वाधिक शेअर राज्य सरकारला टॅक्सच्या स्वरुपात मिळत असतात. बिअरच्या वाढत्या किमती पाहता असे असले तरी देशात गेल्या दोन वर्षांमध्ये बिअर व मद्याच्या भावात वाढ झालेली आहे. प्रीमिअम बिअरच्या(Beer) मागणीत अधिक वाढ झालेली दिसून येत आहे.

Smart News:-

NCB: 500 कोटी रुपयांच्या हेरॉईन ड्रग सह ९ जणांना अटक


नाशिक जिल्‍ह्यात ‘रोहयो’ अंतर्गत २२ हजार मजुरांच्या हाताला काम


गायक सिद्धू मूसेवाल हत्ये प्रकरणी 6 जणांना पंजब पोलीसांच्या ताब्यात


सैन्यातील अधिकाऱ्यावरच जातपंचायतीचा बहिष्कार, कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार


मुंबई : सीजन हॉटेलमध्ये 7 वर्षांच्या मुलीचा कुजलेला मृतदेह


 

Leave a Reply

Your email address will not be published.