सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळताच रणवीर रडला, दीपिकाला म्हणाला लक्ष्मी!

बाॅलीवूड अभिनेता रणवीर सिंग आपल्या उत्कृष्ट अभिनयाबरोबरच (acting ) फॅशन सेन्ससाठी ओळखला जातो. नुकतचं अभिनेत्याला ६७ व्या फिल्फफेअर पुरस्कार सोहळ्यात (Flimfare Awards 2022) ‘८३’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर रणवीर खूपच भावूक झाला आणि तो आपले आनंदाश्रू आवरु शकला नव्हता. रणवीर सिंगने याचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केला आहे. (acting )
रणवीरने शेअर केलेल्या व्हिडिओत दिसते की सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारासाठी रणवीर सिंगचे नाव पुकारतो. त्यानंतर रणवीर व्यासपीठावर येतो आणि आपल्या भावना व्यक्त करतो. मात्र या दरम्यान तो भावूक होतो व रडू लागतो. त्यानंतर तो म्हणतो, माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे, त्याची मी अपेक्षा ठेवली नव्हती. मला विश्वास बसत नाही की मी हे करत आहे आणि तुम्हा सर्वांसमोर उभा आहे.