आलियासोबत मोठा विश्वासघात; उचललं टोकाचं पाऊल..!

आपल्या घायाळ अदांनी चाहत्यांना ‘क्लिनबोल्ड’ करणारी अभिनेत्री आलिया लवकरचं लग्न बंधनात अडकणार आहे. एप्रिल महिन्यात आलिया आणि रणबीर कपूर लग्न करणार असल्याची माहिती समोर येत आहे. पण याबद्दल अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. लग्नाची घोषणा होण्याआधीचं आलियासोबत मोठा विश्वास घात झाला आहे. ज्यामुळे तिने इन्स्टाग्रामवरील (instagram post) काही पोस्ट देखील डिलीट केल्या आहेत.
आलिया सध्या ‘आरआरआर’ सिनेमामुळे तुफान चर्चेत आहे. ‘आरआरआर‘ सिनेमा बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करताना दिसत आहे. सिनेमा यशाच्या दिशेने वाटचाल करत असताना आलिया मात्र नाराज आहे.(instagram post)
‘आरआरआर’ सिनेमातून आलियाने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. सिनेमात आलियाचा फार लहान सीन दाखवल्यामुळे आलिया नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे.
एवढंच नाही, तर तिने इन्स्टाग्राम पेजवरून ‘आरआरआर’ सिनेमाच्या काही पोस्ट देखील डिलीट केल्या आहे. शिवाय आलियाने दिग्दर्शक एसएस राजामौली यांना अनफॉलो केलं असल्याचं सांगण्यात येत आहे.
सिनेमात आलियाने सीता ही भूमिका साकारली आहे. आलिया शिवाय सिनेमात अभिनेता अजय देवगण, रामचरण (Ramcharan) आणि जूनियर एनटीआर (Junior NTR) देखील मुख्य भूमिकेत आहेत.
हेही वाचा :