‘KGF Chapter 2’ सिनेमाला तिसऱ्या आठवड्यात मोठा धक्का!

कोरोनानंतर दर शुक्रवारी मोठ्या पडद्यावर नवीन सिनेमे प्रदर्शित होत आहेत. 14 एप्रिलला देखील एक दमदार सिनेमा चाहत्यांच्या भेटीस आला, तो सिनेमा म्हणजे ‘KGF Chapter 2’. सिनेमाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम देखील मिळालं. गेल्या तीन आठवड्यांपासून सिनेमा अव्वल आहे,. बॉलिवूडचे सिनेमे देखील  सिनेमापुढे फिके ठरले आहे. बॉक्स ऑफिसवर सध्या केजीएफ सिनेमासोबतचं ‘हीरोपंती 2’ आणि ‘रनवे 34’ सिनेमे आहेत.

पण ‘हीरोपंती 2’ आणि ‘रनवे 34’ सिनेमे चाहत्यांचं मनोरंजन करण्यास अपयशी ठरले आहेत. पण ‘केजीएफ‘ सिनेमाला तिसऱ्या आठवड्यात मोठा धक्का बसला आहे. सलग तीन आठवडे अव्वल असणाऱ्या ‘केजीएफ’ सिनेमाची बॉक्स ऑफिसवर गती मंदावली आहे.

‘KGF Chapter 2’ ला पुन्हा एकदा रिलीजच्या 18 व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या रविवारी वीकेंडचा फायदा झाला. रविवारी देखील सिनेमाने उत्तम कामगिरी केली. रविवारी संपूर्ण देशाच्या आकडेवारीनुसार सिनेमाने 21.50 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.

तिसऱ्या सोमवारी सिनेमाने हिंदी भाषेत 4 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. तर पूर्ण देशात सिनेमाने 10 कोटी रुपयांचा गल्ला देखील जमा करू शकला नाही. आकडेवारीनुसार, सिनेमाने 19 व्या दिवशी जवळपास 9 कोटींची कमाई केली आहे.

‘KGF 2’ सिनेमाला तिसऱ्या आठवड्यात मोठा धक्का बसला आहे. पण शाहीद कपूरची ‘जर्सी’, टायगरचा ‘हिरोपंती 2’ आणि अजय देवगणचा ‘रनवे 34’ हे तीन बॉलिवूड सिनेमे थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत. हे तिन्ही बॉलीवूड सिनेमे केजीएफला टक्कर देण्यात अपयशी ठरले आहेत.

हेही वाचा :


75000 मनसैनिकांना नोटीस तर आज नवी ‘राज’गर्जना..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *