शहनाज गिलच्या ऑफ शोल्डर टॉपमध्ये घायाळ करणाऱ्या अदा

bigg boss 13

बिग बॉस १३ (bigg boss 13) मधून लोकप्रिय झालेली शहनाज गिल (Shehnaaz Gill), सलमान खानचा (Salman Khan) आगामी चित्रपट ‘कभी ईद कभी दिवाली’ (Kabhi Eid Kabhi Diwali) मुळे सध्या चर्चेत आहे. चित्रपटाचे शूटिंग मुंबईत सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

अभिनेत्री शहनाज गिल(bigg boss 13) या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवुडमध्ये पदार्पण करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिनेमाचे पहिला शूटिंग शेड्यूल मुंबईत सुरू झाले आहे. त्यानंतरचे चित्रीकरण हैदराबाद आणि भारताच्या उत्तरेतल्या शहरांमध्येही केले जाईल.

शहनाजने नुकतेच बॉलीवुडचे प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानीसोबत (Daboo Ratnani) एक फोटोशूट केले. हे फोटो डब्बू यांनी आपल्या सोशल मीडिया हॅंडलवरून शेयर केले आहेत. पाहतापाहता हे फोटो व्हायरल झाले आहेत. शहनाजचे चाहते हे अनोखे फोटो पाहून तिच्यावर कमालीचे फिदा झाले आहेत.

चाहत्यांचे म्हणणे आहे, की पंजाबची कटरीना कैफ (Shehnaaz Gill), बॉलीवूड अभिनेत्री कॅटरीना कैफलाही मागे टाकेल. सलमान आणि कॅटरीना कैफची जोडी चालली तशीच सलमान खान आणि पंजाबच्या या कॅटरीना कैफची (Shehnaaz Gill) जोडी सुपरहिट होईल. काही फॅन्स शहनाजच्या पंजाबी बोलण्याच्या शैलीवर खूपच फिदा आहेत. या अभिनेत्रीला विश्वास वाटतो, की भाषा कुठलीही असो, मन शुद्ध असायला हवे, यश नक्कीच मिळेल.

दिसली कमालीची ग्लॅमरस
बिग बॉसमधून चर्चेत आलेली शहनाज आता एकदमच ग्लॅमरस आणि स्टायलिश झाली आहे. तिचे व्हायरल होणारे फोटो याची पुरेशी साक्ष देतात. या फोटोजमध्ये तुम्ही पाहू शकता, की शहनाजने एक खास ऑफ शोल्डर टॉप घातला आहे. सोबतच तिने न्यूड मेकअप केला आहे आणि हातात एक पांढरे फूल धरले आहे.

हेही वाचा :


राज्यातील 70 लाख शेतकऱ्यांना फटका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *