कमी वयातच आराध्याची कमाल, पाहून ऐश्वर्याही थक्क!

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (aishwarya rai) आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांची मुलगी, आराध्या बच्चन हिनं जन्माच्या पहिल्या दिवसापासूनच सर्वांना थक्क केलं. आराध्याच्या येण्यानं बिग बी अमिताभ बच्चन यांच्या घराचं गोकुळ झालं.
पाहता पाहता आराध्या आता इतकी मोठी झाली, की तिला पाहून खुद्द ऐश्वर्याही थक्क होत आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमुळं आराध्याच्या नावाची चर्चा सुरु आहे.
ही चर्चा अर्थातच एका जुन्या व्हिडीओमुळं सुरु आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ज्यावेळी ऐश्वर्यानं (aishwarya rai) आराध्याला कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये नेलं होतं हा तेव्हाचा व्हिडीओ असल्याचं सांगण्यात येत आहे.
हा एक बॅकस्टेज व्हिडीओ असल्याचं कळत आहे. जिथं आराध्या रॅम्प वॉक करताना दिसत आहे. जशी ऐश्वर्या रॅम्पवर आल्यानंतर आपल्या अदांनी सर्वांना घायाळ करते, त्याचप्रमाणं आराध्याही आईच्याच पावलावर पाऊल ठेवत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय खरा. पण, त्यावर सर्वजण सकारात्मकरित्याच व्यक्त होत आहेत असं नाही. कारण आराध्या आता मोठी झालीये असं म्हणत काहींनी तिची इथं खिल्ली उडवत तिच्यावर उपरोधिक टीकाही केली आहे.
हेही वाचा: