ऐश्वर्या रॉय मालामाल, केली कोट्यवधींची कमाई

बॉलीवूडची (bollywood) अभिनेत्री ऐश्वर्या रॉय ही सध्या चर्चेत आली आहे. ते तिच्या आगामी चित्रपटामुळे गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून लांब असलेली ऐश्वर्या साऊथच्या एका चित्रपटामधून पुन्हा चाहत्यांसमोर येणार आहे. तिच्या त्या चित्रपटाची प्रचंड प्रमाणात उत्सुकता असल्याचे दिसून आले आहे. पोनियम सेल्वन नावाच्या चित्रपटातून ती झळकणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच ऐश्वर्यानं कोट्यवधी रूपये कमावले आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या पॅन इंडिया अंतर्गत या चित्रपटातील ऐश्वर्यांच्या लूकनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
दहाव्या शतकातील एक आगळी वेगळी कथा प्रेक्षकांसमोर येणार आहे. पिरियड ड्रामा प्रकारातील या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या तीन वर्षांपासून वाट पाहत आहेत. कोरोनामुळे हा चित्रपट लांबणीवर पडला होता. ऐश्वर्याचा आतापर्यतचा सर्वाधिक महागडा चित्रपट असल्याचे सांगण्यात येत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याचे ओटीटी हक्क अॅमेझॉननं विकत घेतले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तब्बल 125 कोटी रुपये या चित्रपटाला मिळाले आहेत. भलेही हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होत असला तरी जेव्हा तो डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल तेव्हा त्यानं मोठी कमाई अगोदरच करुन ठेवली आहे.(bollywood)
पोनियन सेल्वन 1 याचे दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केले आहे. यापूर्वी मणिरत्नम यांच्या गुरु आणि रावण चित्रपटातून ऐश्वर्यानं भूमिका केल्या आहेत. एका तमिळ कादंबरीवर आधारित हा चित्रपट असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रसिद्ध लेखक कल्कि यांनी 1995 मध्ये ही कादंबरी लिहिली होती. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्याचा या चित्रपटातील फर्स्ट लूक समोर आला होता. त्यानंतर या चित्रपटातील विक्रम, जयम रवि, शोभिता यांचे लूकही नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
Smart News:-