आदिवासी संघटनेचा झटका, राखी सावंत ताळ्यावर: मागितली माफी

bollywood

बॉलीवूडमध्ये (bollywood) आपल्या वादग्रस्त वक्तव्यानं नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणून राखीचं नाव घ्यावं लागेल. तिनं केलेली वक्तव्यं सोशल (Rakhi Sawant) मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असतात. अभिनेत्री कंगना रनौत (kangana ranaut) आणि राखी सावंत (rakhi sawant) यांच्यातील जुगलबंदी कायमच नेटकऱ्यांसाठी मनोरंजनाचा विषय असतो. काही दिवसांपूर्वी राखी सावंत ही चर्चेत आली होती. त्याचे कारण तिनं आदिवासी समुहाविषयी वादग्रस्त वक्तव्यं (viral news) केलं होतं. त्यामुळे तिच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. अखेर आदिवासी संघटनेच्याआक्रमक पवित्र्यामुळे तिनं माफी मागितली आहे. (bollywood actress) सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये राखीनं केलेलं वक्तव्य चर्चेत आलं होतं.

काही दिवसांपूर्वी राखी सावंतनं स्वतःच्या सोशल मीडियावर अंगप्रदर्शन करून व्हिडिओद्वारे आदिवासींची बदनामी केली होती त्यामुळे देशातील आदिवासींच्या भावना दुखावल्याने राखी सावंत विरोधात आदिवासींच्या संघटना व समाज आक्रमक झालेला होता. अखेर त्याची दखल काही संघटनेकडून घेण्यात आली. आज राखीच्या घरी जावून काही आदिवासी बांधवांनी निषेध नोंदवला. य़ाप्रकरणी मुंबई पोलिसांना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी निवेदन देण्यात आले होते. यावेळी मुंबई सहाययक पोलीस आयुक्त सूर्यकांत बांगर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनावडे, गोपीनिय शाखेचे बेरागी उपस्थित होते.(bollywood)
rakhi sawant news

मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेऊन त्यासंबंधी नोटीस काढली. त्यानंतर राखीशी संपर्क साधण्यात आला. तिनं व्हिडीओ द्वारे व लेटरद्वारे आदिवासींची माफी मागितली. अशी माहिती आदिवासी टायगर फाउंडेशन चे अध्यक्ष एम डी बागुल आणि आदिवासी क्रांतिकारक राया ठाकर फाउंडेश चे अध्यक्ष कृष्णा गृहिरे यांनी दिली.

हेही वाचा:


सोमय्यांची जखम खरी की खोटी?, भाभा हॉस्पिटलचा वैद्यकीय अहवाल समोर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *