सोहा अली खानकडून पती, कुणाल खेमूला जबर मारहाण

bollywood

पतीपत्नीच्या नात्यात बऱ्याचदा खटके उडत असतात, पण हे वाद आणि मतभेद शक्यतो आपापसातच मिटवण्याला अनेक जोड्या प्राधान्य देताना दिसतात. घरातले वाद चव्हाट्यावर कशाला, असंच म्हणत या जोड्या वादावर तोडगा काढताना दिसतात. पण, एका लोकप्रिय बॉलिवूड (bollywood) जोडीनं तर हद्दच केली.

अभिनेत्री सोहा अली खान आणि अभिनेता कुणाल खेमू या दोघांमध्येही सध्या असं काहीतरी घडलंय ज्यामुळं त्यांच्यात असणारे मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. (Kunal kemmu, Soha ali khan)

सोहानं म्हणे कुणालला मारहाणही केली आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये कुणाल रक्तबंबाळ अवस्थेत दिसत आहे. हे पाहून चाहतेही विचलित झाले आहेत.(bollywood)

सोहा असं काही करेल याची अपेक्षा नव्हती, अशा प्रतिक्रिया काहींनी दिल्या आहेत. तर, काहींनी तुला अशीच शिक्षा मिळायला हवी असं म्हणत या अभिनेत्याला ट्रोल केलं आहे.

आता मुद्दा असा, की खरंच कुणालला मारहाण झालीये ? याचं उत्तर आहे, नाही. कुणालनं शेअर केलेला हा व्हिडीओ विनोदी अंदाजात शेअर करण्यात आला आहे. खुद्द अभिनेत्यानंच हा व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यानं, Badla!! (It’s been quite a jobless Wednesday morning) असं लिहिलं. कुणालनं हा व्हिडीओ शेअर करता सोहा आणि त्याच्या कलाकार मित्रांनी अतिशय विनोदी प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं.

तुम्ही दोघं अशक्य आहात अशा शब्दांतही त्यांच्या या व्हिडीओवर काही सेलिब्रिटी व्यक्त झाले. कुणालनं सोहाची काही दिवसांपूर्वी खिल्ली उडवली होती, तिचा एक विनोदी व्हिडीओही पोस्ट केला होता. ज्यानंतर आता सोहानं जणू, त्याचाच सूड उगवत कुणालची ही अवस्था केली, असं म्हणायला हरकत नाही….

Smart News:-

सांगली : महिला सावकार सुवर्णा पाटील पसार


‘एमपीएससी’चे विद्यार्थी न्यायालयात…


भाजप-राष्ट्रवादी-शिवसेना युतीबाबत राऊतांचं महत्वाचं वक्तव्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *