तुम्हा-आम्हालाही परवडेल Kriti Sanon चा फॅशन सेन्स…

बॉलिवूड (bollywood) अभिनेत्री क्रिती सेनन तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. याशिवाय तिचा ड्रेसिंग सेंन्सही खूप पसंत केला जातो. तिच्या प्रत्येक ड्रेसकडे चाहत्यांची नजर असते. एखाद्या लग्नात, कार्यक्रमात किंवा पार्टीमध्ये कोणता ड्रेस घालायचा यासाठी अनेक मुली कृतीला फॉलो करतात. नुकताचं कृतीला दिग्दर्शक करण जोहरच्या पार्टीत स्पॉट करण्यात आलं. पार्टीमध्ये कृती मरुन रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये पोहोचली.
महत्त्वाचं म्हणजे कृती पार्टीत घालून आलेल्या ड्रेसची किंमत फार कमी आहे. कृतीचा हा फॅशन सेन्स तुम्हाआम्हालाही परवडणारा आहे. कृतीच्या या ड्रेसची किंमत जवळपास 4 हजार 884 असेल. त्यामुळे एखाद्या पार्टीत जाण्यासाठी कृतीची ही स्टाईल एक उत्तप पर्याय आहे.
कृती सननचे सिनेमा
वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, क्रिती सेनन ‘हम दो हमारे दो’ सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिने राजकुमार रावसोबत काम केलं होतं. याआधी तिने ‘मिमी’ सिनेमात काम केलं होतं ज्यात तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं. (bollywood)
आजकाल क्रिती सेननचे अनेक सिनेमे आहेत, जे एकामागून एक प्रदर्शित होणार आहेत. क्रिती ‘बच्चन पांडे’, ‘आदिपुरुष’, ‘शेहजादा’, ‘भेडिया’ आणि ‘गणपथ’ यांसारख्या सिनेमांचा भाग आहे. याशिवाय ती अनुराग कश्यपच्या सिनेमात दिसणार आहे. मात्र या सिनेमाचं नाव अद्याप ठरलेलं नाही.
Smart News:-