हृदयद्रावक! मुलाच्या निधनानंतर अवघ्या 2 महिन्यातच अभिनेत्याचा मृत्यू..!

bollywood news

11 एप्रिलची सकाळ बॉलिवूडसाठी (bollywood news) एक मोठी दुःखद बातमी घेऊन आली आहे. प्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि पटकथा लेखक शिवकुमार सुब्रमण्यम  यांचे निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. ‘टू स्टेट’ या चित्रपटात आपल्या दमदार भूमिकेने ऑनस्क्रीन भूमिका साकारणारे शिव सुब्रमण्यम यांचे रात्री उशिरा मुंबईत निधन (passed away) झालं. आज त्यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शिवकुमार सुब्रमण्यम काही दिवसांपूर्वी ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’ या सिनेमात दिसले होते. या सिनेमात अभिनेत्री सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra) ​​मुख्य भूमिकेत होती. शिवकुमार यांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. त्यांच्या निधनाची बातमी चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनी दिली आहे. त्यात अंत्यसंस्काराच्या तपशीलांचाही समावेश आहे. (bollywood news)

हंसल मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकुमार सुब्रमण्यम यांच्या पार्थिवावर 11 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता मोक्षधाम हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

bollywood news

मुलाचा ब्रेन ट्युमरनं 2 महिन्यांपूर्वी मृत्यू

शिवकुमार सुब्रमण्यम यांच्या निधनाबद्दल चित्रपट निर्मात्या बिना सरवर यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटरवर अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली आणि खुलासा केला की, दोन महिन्यांपूर्वी त्यांचा मुलगा जहानचा ब्रेन ट्यूमरमुळे मृत्यू झाला होता. त्यांनी लिहिले, ‘खूप दु:खद बातमी. मुलगा जहानच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन महिन्यांतच त्यांचे निधन झाले. त्यांचा मुलगा जहान याला ब्रेन ट्युमर झाला होता. 16 व्या वाढदिवसापूर्वी त्यांचे निधन झालं.

या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये केले काम

‘टू स्टेट’ व्यतिरिक्त सुब्रमण्यम ‘तीन पत्ती’, ‘प्रहार’ आणि राणी मुखर्जी स्टारर ‘हिचकी’मध्येही दिसले. त्यांनी विधू विनोद चोप्राच्या ‘परिंदा’ आणि सुधीर मिश्रा यांच्या ‘हजारों ख्वैशीं ऐसी’ या चित्रपटाची पटकथा लिहिली. शिव कुमारने ‘मुक्ती बंधन’ या टीव्ही शोमध्येही काम केले होते.

हेही वाचा :


‘मुंबई का शाणा’ बोलताच 2 क्रिकेटपटूंमध्ये राडा, VIDEO

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *