फक्त 1 रुपयांमध्ये घर आणा LLOYD चा AC, अशी आहे Summer ऑफर

AC

LLOYD कंपनीनं नव्या सेलची सुरुवात केली आहे. Lloyd Great Summer Bonanza सेल या महिन्याच्या अखेरपर्यंत अर्थात 30 एप्रिल पर्यंत सुरु राहणार आहे. यात कंपनीनं 5 वेगवेगळ्या ऑफर्सची घोषणा केली आहे.

जर तुम्ही देखील गर्मीपासून वाचण्यासाठी एक नवीन AC विकतघेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या ऑफर्सचा फायदा घेऊ शकता.

LLOYD कंपनी आपल्या निवडक एसी मॉडेल्सवर जबरदस्त ऑफर्स देत आहे. यातील पहिली ऑफर अशी आहे की तुम्ही कंपनीचा एसी फक्त 1 रुपया देऊन घरी आणू शकता. दुसऱ्या ऑफरमध्ये तुमच्या खरेदीवर तुम्हाला 15 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. तिसरी ऑफर फक्त 699 रुपयांमध्ये एसी इंस्टॉलेशन करून देते. चौथ्या ऑफर अंतर्गत जुना एसी एक्सचेंज केल्यास 5,000 रुपयांची सूट मिळेल. शेवटची ऑफर 4 वर्षांपर्यंत मोफत वॉरंटी मिळवून देते.

फक्त 1 रुपयांमध्ये AC

ही LLOYD नं सादर केलेली AC फायनान्सिंग ऑफर आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही फक्त एक रुपया देऊन AC घरी आणू शकता आणि उर्वरित रक्कम तुम्ही EMI मध्ये देऊ शकता. ही ऑफर LLOYD च्या निवडक मॉडेल्स आणि स्टोर्सवरच उपलब्ध आहे.या सर्व ऑफर्स 30 एप्रिल पर्यंत वैध असतील. तसेच प्रत्येक ऑफरसाठी काही नियम आणि अटी आहेत, त्यामुळे जर तुम्ही एसी विकत घेण्याचा विचार करत असला तर त्यांची पूर्णपणे माहिती घ्यावी.

Smart News:-

“३० वर्षांपासून अयोध्या-शिवसेनेचं विशेष नातं”; आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर राऊत स्पष्टच बोलले


सदावर्तेंच्या प्रॉपर्टीचं घबाड; घरात नोटा मोजण्याचं मशीन, भारदस्त कार घेतल्याचा सरकारी वकिलांचा दावा


26 एप्रिल 2022 पासून सुरू होणार सीबीएसईच्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा


सुरेश रैनाने घेतली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट.


सांगली: कृष्णा नदीवर २१ पूल, मग कसा ओसरणार महापूर?,


Leave a Reply

Your email address will not be published.