ड्रेस सांभाळता सांभाळता दीपिकाला फुटला घाम (Video)

बॉलिवूड दीवा दीपिका पदुकोण कान्स चित्रपट महोत्सवात (Cannes Festival) आपल्या जबरदस्त लुक्सने सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. गेले चार-पाच दिवस ती रेड कार्पेटवर एखाद्या परीप्रमाणे अवतरलीय. तिचे फॅन्स रोडच अभिनेत्रीच्या ड्रीम लूकची वाट पाहत असतात. आता दीपिकाचा लेटेस्ट लूक पाहिला तर ऑरेंज कलरच्या (cannes festival)वनपीस फ्लोरल गाऊनमद्ये तिने स्वत:ला प्रेझेंट केले आहे. ऑरेंज कलरच्या गाऊनमध्ये दीपिका रेड कार्पेटवर उतरली; पण फॅशनसोबत कधी कधी धोकाही येतो असं म्हणतात. दीपिकाच्या बाबतीतही तसंच काहीस घडलं.

दीपिकाचा ड्रीम लूक
दीपिकाने मंगळवारी ऑरेंज रंगाचा गाऊन (cannes festival) परिधान केला होता. तिने कान्सच्या रेड कार्पेटवर वॉक केला. तिचा गाऊन खूपच स्टायलिश होता. अभिनेत्रीने स्का ब्ल्यू कलरचे इअररिंग्ज घातल्या होत्या. केशरी लिपस्टिक, साधा मेकअप, हेअरपिन आणि सुंदर हास्यासह हा आकर्षक असा गाऊन तिने परिधान केला होता. दीपिका रेड कार्पेटवर ज्युरी मेंबर्ससोबत पोज देत होती. ते सर्वजण L’innocent चित्रपटाच्या स्क्रीनिंगला उपस्थित होते. दीपिकाच्या या ड्रामाटिक गाऊनच्या ट्रेनमुळे तिला चालायला खूप त्रास होत होता.

गाऊनमुळे दीपकाला चालणे अवघड झाले
तिचा ड्रेस पुन्हा पुन्हा पायात अडकत होता. हा ड्रेस सावरता सावरता तिला नाकीनऊ आले. मग, तिने स्वत: ड्रेसचा गुंता सोडवला. चालताना, पायऱ्या चढतानाही दीपिकाला किती त्रास झाला असेल याची कल्पना आपण करू शकतो. पायऱ्या चढत असताना दीपिकाने ड्रेस हातात वर धरला आणि मग पायऱ्या चढल्या. बाकी ज्युरी सदस्य आपापसात पोज देत असताना दीपिका पदुकोण तिचा ड्रेस फिक्स करताना दिसली.

दीपिकाचा तिच्या ड्रेससोबतचा झालेला प्रकार पाहून अनेकांना तिच्याबद्दल सहानुभूती वाटली. तर अनेक जण तिला ट्रोलही करत आहेत. लोक असेही म्हणतात की, दीपिकाचा सहाय्यक तिला मदत करण्यासाठी, ड्रेस हाताळण्यासाठी कुठे आहे. दीपिका तिचा ड्रेस स्वतः सांभाळत असल्याचे पाहून युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. एका युजरने मजेशीर कमेंट करताना लिहिले – ‘त्यामुळेचं फोटोत सगळे हसत आहेत तर!’

हेही वाचा :


पेन्शनचे नियम बदलले! मोदी सरकारचा मोठा निर्णय!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *