Deepika Padukone चा रेड कार्पेट लूक, शिमरी साडीत दिसते हॉट!

कान्स फिल्म फेस्टिवल 2022 (Cannes Film Festival 2022) ची सुरुवात झाली आहे. फेस्टिवलचा आनंद घेण्यासाठी बॉलिवूडचे अनेक सेलेब्रिटी सज्ज झाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे यंदाच्या वर्षीचं कान्स फिल्म फेस्टिवल खास आहे. यावर्षी भारताला ‘कंट्री ऑफ ऑनर’ ने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामुळे कान्स फिल्म फेस्टिवल यंदाचं फक्त सेलिब्रिटींसाठीचं नाही तर, भारतीयांसाठी खास आहे.
अभिनेत्री दीपिका पदुकोण यावेळी (cannes film festival 2022) कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 च्या ज्युरीचा भाग बनली आहे. 17 मे रोजी संध्याकाळी ज्युरींची पत्रकार परिषद झाली. यामध्ये दीपिका पदुकोणने सब्यसाचीने डिझाइन केलेला पॅंट-शर्ट आउटफिट कॅरी केला होता.
कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये दीपिकाचा पारंपरिक लूक
दीपिका पदुकोणने यावेळी कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 पूर्णपणे पारंपारिक लूक कॅरी करण्याचा निर्णय घेतला. 17 मे ते 28 मे पर्यंत चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये दीपिका पदुकोण पारंपारिक लूकमध्ये दिसणार आहे.
रेड कार्पेट लूकमध्ये दीपिका पदुकोणने काळ्या आणि सोनेरी रंगाची शिमरी साडीला प्राधन्य दिलं. स्टायलिस्ट शालिना नंथानीने दीपिका पदुकोणचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये दीपिका प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.
हेही वाचा :