मोबाइल गेमिंग आवडणाऱ्यांना करिअरची संधी; iQOO कंपनीची भन्नाट ऑफर

गेमिंगची आवड असलेल्यांना आता हेच करिअर करता येऊ शकतं. गेमिंग ऑफिसर म्हणून उत्तम कंपनीत नोकरी मिळवता येऊ शकते. iQOO ही स्मार्टफोन कंपनी सध्या अशा उमेदवारांच्या शोधात आहे. मोबाइलवर गेमिंगचा व ई-स्पोर्ट्सचा उत्तम अनुभव देऊ शकेल अशा चीफ गेमिंग ऑफिसर पदासाठी योग्य उमेदवार त्यांना हवा आहे.
स्मार्टफोन गेमिंगची खूप आवड असलेले व त्यात करिअर करण्याची इच्छा असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. त्यासाठी iQOOच्या अधिकृत वेबसाइटवर माहिती मिळू शकेल किंवा ‘iQOO India’ या त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर नोंदणी करता येईल. 30 मेपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. 11 जून 2023पर्यंत ती सुरू राहील.
स्मार्टफोनवरचे गेम्स कसे खेळले जातात, गेम्सची स्टाइल, तो कसा सादर होतो व ते कसे समजून घ्यायचे या दृष्टिकोनातून गेमर्ससाठी उत्तम अशा स्मार्टफोनची निर्मिती करणं ही त्यामागची कंपनीची भूमिका आहे. चीफ गेमिंग ऑफिसरला भारतातल्या हुशार गेमर्सबरोबर काम करण्याची संधी मिळेल. त्याचबरोबर पहिल्या सीजीओला (Chief Gaming Officer) 10 लाख रुपयांचं बक्षीसही मिळेल. iQOO कंपनीचे सीईओ निपुण मार्या यांच्या मते, सध्याच्या जनरेशन Zला गेमिंगची खूप आवड आहे.
त्याचा गेमिंग उद्योगावर मोठा परिणाम होतो आहे. भारतीय गेमर्सना गेमिंगचा नावीन्यपूर्ण अनुभव देण्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. त्याद्वारे या क्षेत्रातल्या तरुण आणि हुशार व्यक्तींना संधी मिळेल, असं कंपनीचं म्हणणं आहे.Maths Puzzle: मॅथ्स पक्कं आहे?
गेल्या वर्षी म्हणजे 2022मध्ये भारतात गेमिंगची लोकप्रियता खूप वाढली. गेम्स डाउनलोडिंगच्या जागतिक आकडेवारीत 17 टक्के सहभाग जनरेशन Zचा होता, तर जवळपास 2 अब्ज मंथली अॅक्टिव्ह युझर्स (MAUs) होते. आता भविष्यातलं मोबाइल गेमिंग क्षेत्र विस्तारू पाहणाऱ्या व्यक्तींसोबत काम करण्याची कंपनीची इच्छा आहे. गेमिंगचं पॅशन असलणाऱ्यांना यात करिअर करण्यासाठी ही चांगली संधी आहे.