हनीमूननंतरचा कॅट-विकीचा सर्वात बोल्ड फोटो व्हायरल!

कॅटरिना कैफ आणि विकी कौशल हे लग्न झाल्‍यापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. या दोघांची फॅन फॉलोइंगही त्‍यांच्‍याबद्‍दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे. आता कॅटने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. (vikat) या फोटोमध्ये ती पती विकी कौशलसोबत दिसत आहे. फोटोमध्ये दोघेही पूलमध्ये (honeymoon) रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.

कॅटने पूल फोटो शेअर करताना दिलेले कॅप्शनही नेटकऱ्यांना आवडली आहे. या फोटोमध्ये (honeymoon) कॅटरिनाने पांढऱ्या रंगाचा स्वीमसूट घातला आहे. फोटोमध्ये ती विकी कौशलसोबत रोमँटिक अंदाजात दिसत आहे. दोघेही कॅमेऱ्याकडे पाहत असतानाची पोज आहे. फोटो शेअर करत अभिनेत्री कॅटने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “सलमान भाई जळाले असतील”. तर तिथे आणखी एका युजरने लिहिले की, “पाण्याला आग लावली, भाऊ”. आणखी एका युजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले – कोणीतरी सलमान भाईला टॅग करा.

कॅटच्या या फोटोवर तिचे चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. कोणी या जोडप्याला ‘क्यूट’ तर कोणी ‘Perfection blessings to you both’ सांगत आहेत.

कॅटच्या या लेटेस्ट पोस्टला चाहत्यांसह सेलिब्रिटींनाही पसंती मिळत आहे. या पोस्टला अल्पावधीतच ४ लाख ७० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या पोस्टवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, “आमच्या विकीचे कपडे कुठे गेले”, तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, “सलमान भाई जळाले असतील”. तर तिथे आणखी एका युजरने लिहिले की, “पाण्याला आग लावली, भाऊ”. आणखी एका युजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले – कोणीतरी सलमान भाईला टॅग करा.

 

व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये विकी-कॅट यांच्यातील धमाकेदार केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. डिसेंबरमध्ये लग्न झाल्यापासून विकी कौशल आणि कॅटरिना कैफ त्यांच्या चित्रपटांमध्ये मग्न होते. आता वेळ मिळताच हे जोडपे एकमेकांसोबत क्वालिटी टाईम घालवत आहेत.

चाहते ‘टायगर ३’च्या प्रतीक्षेत
विकी कौशल आणि कॅटरिना कैफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, विकी कौशल लवकरच गोविंदा नाम मेरा आणि द ग्रेट इंडियन फॅमिली यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे. चाहते कॅटच्या टायगर ३ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात कॅटरिना कैफ आणि सलमान खान एकत्र दिसणार आहेत.

हेही वाचा :


राज ठाकरे माफी मागणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *